Also visit www.atgnews.com
मस्तच! १० वी पाससाठी रेल्वेत ४०० पदांची भरती
दिल्लीः दहावी उत्तीर्ण झालेल्या बेरोजगार तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. रेल्वे मंत्रालय रेल्वे कोच कारखान्यात (Rail Coach Factory) ४०० पदांची लवकरच भरती करणार आहे. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. अर्ज करण्याची अखेरची तारीकख ६ फेब्रुवारी आहे. या पदांसाठी अर्ज करणारा तरुण कमीत कमी १० वी उत्तीर्ण असायला हवा, तसेच त्याच्याकडे आयटीआय सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे. रेल्वेने रेल्वे कोच फॅक्ट्रीत फीटर, वेल्डर, मशिनिस्ट, पेंटर, सुतारकाम, मॅकेनिक, इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक मॅकनिक आणि एसी अँड रेफ्रिजरेटर मॅकनिक या पदासाठी ही जाहिरात काढली आहे. या पदावर भरती होणार फीटर, वेल्डर, मशिनिस्ट, पेंटर, सुतारकाम, मॅकेनिक, इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक मॅकनिक आणि एसी अँड रेफ्रिजरेटर मॅकनिक एकूण संख्याः ४०० या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय जास्तीत जास्त २४ असायला हवे. अर्ज करणाऱ्या तरुणाला १०० रुपये फी भरावी लागणार आहे. उमेदवारांची निवड प्रक्रिया लिखित नसणार आहे. उमेदवारांची निवड गुणवत्ता यादीनुसार होईल. दहावीत मिळालेले गुण किंवा आयटीआय परीक्षेतील गुण या आधारावर त्याची गुणवत्ता ठरवली जाईल. असा करा अर्ज इच्छुक उमेदवारांनी rcf.indianrailways.gov.inया वेबसाइटवर जावे. वेबसाइटवर जाऊन लॉगइन करावे सर्व माहिती व्यवस्थित भरावी फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करावी अर्ज फी भरावी सर्व अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रिंट काढून ठेवावी.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2RtuFIb
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments