इस्टर्न रेल्वेत अपरेंटिसशीप; आजपासून अर्ज सुरू

नवी दिल्ली: बोर्डात विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. पूर्व रेल्वेकडून २,७९२ पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. १४ फेब्रुवारी २०२० पासून अर्ज भरायला सुरूवात झाली आहे. काय आहे पात्रता? कसा भरायचा अर्ज?... वाचा भरती प्रक्रियेविषयी अधिक माहिती पुढीलप्रमाणे - पदाचे नाव - अॅक्ट अपरेंटिस पदांची संख्या - २,७९२ शैक्षणिक पात्रता - दहावीत किमान ५० टक्के गुणांनी उत्तीर्ण असणे आवश्यक. विविध पदांनुसार विविध पात्रता आवश्यक आहे. वयोमर्यादा - कमाल २४ वर्षे वयापर्यंत अर्ज भरण्याची अखेरची मुदत - १३ मार्च सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत निवड प्रक्रिया - गुणवत्तेच्या आधारे निवड इच्छुक उमेदवारांनी कृपया संपूर्ण नोटिफिकेशन आधी वाचून मगच पुढील प्रक्रिया करावी. ही सर्व पदे रेल्वेच्या इस्टर्न विभागांतर्गत भरली जाणार आहेत, याची कृपया नोंद घ्यावी.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2tVpSWM
via IFTTT

Post a Comment

0 Comments