दिल्ली: सीबीएसई बारावीचा इंग्रजी पेपरही रद्द

नवी दिल्ली: दिल्लीत सुरू असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर २७ फेब्रुवारीला होणारी बारावीची इंग्रजी विषयाची परीक्षाही उत्तर आणि ईशान्य भागात रद्द करण्यात आली आहे. यापूर्वी बुधवारचेही काही पेपर लांबणीवर टाकण्यात आले आहेत. आजचा इंग्रजीचा पेपर जेथे रद्द झाला त्या केंद्रांवर तो नंतर घेण्यात येणार आहे, त्याचे डिटेल्स लवकरच मंडळ जाहीर करणार आहे. अन्य केंद्रांवर आज परीक्षा सुरळीत पार पडली आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसईने यासंदर्भातले प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांची गैरसोय होऊ नये म्हणून दिल्लीच्या ईशान्य भागातील काही परीक्षा केंद्रावरील बारावीची इंग्रजी परीक्षा स्थगित करण्यात आली असल्याचं या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. ईशान्य आणि उत्तर दिल्लीमधील एकूण ८० परीक्षा केंद्रांवर गुरुवारी २७ फेब्रुवारी रोजी परीक्षा होणार नाही. या केंद्रांची सविस्तर माहिती सीबीएसईच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. आणखी वाचा -


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2wcspwp
via IFTTT

Post a Comment

0 Comments