पीएचडी व एमफिल प्रवेश परीक्षा स्वतंत्र देता येणार

मुंबई: मुंबई पीएचडी व एमफिल प्रवेश परीक्षा (पेट) ऑनलाईन घेत असून यावर्षी प्रथमच दोन्ही परीक्षेसाठी विद्यार्थ्यास स्वतंत्रपणे अर्ज करता येईल. पीएचडीसाठी ७८ विषयात तर एमफिल साठी २५ विषयात ही प्रवेश परीक्षा होणार आहे. सदर परीक्षेची तारीख लवकरच जाहीर केली जाईल. याचे ऑनलाईन अर्ज दि. २७ फेब्रुवारीपासून सुरु झाले आहेत. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या २०१६ च्या निर्देशानुसार विद्यापीठाने पीएचडी व एमफीलच्या प्रवेशाच्या संदर्भात कुलगुरूंचे निर्देश (Vice Chancellor Direction) प्रसिद्ध केले होते. या आधारावर विद्यापीठाने डिसेंबर २०१८ मध्ये पीएचडी व एमफील प्रवेशासाठी प्रथमच ऑनलाईन प्रवेश परीक्षा घेण्यात आली होती. यानंतर यावर्षीच्या या ऑनलाईन प्रवेश परीक्षेचे अर्ज २७ फेब्रुवारीपासून सुरु झाले असून ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख १८ मार्च २०२० पर्यंत असणार आहे. हे प्रवेश परीक्षेचे अर्ज ऑनलाईन असून याचे शुल्क देखील ऑनलाईनच्या माध्यमातून भरता येणार आहेत. विद्यार्थ्यांना त्याची कोणतीही प्रत विद्यापीठात जमा करण्याची आवश्यकता नाही. परंतु सदर अर्जाची प्रिंटआउट पुढील संदर्भासाठी काढून ठेवण्यात यावी. या पेट परीक्षेचे अर्ज भरताना कोणतेही कागदपत्र सादर करण्याची आवश्यकता नाही. विद्यार्थ्यांनी प्रवेश पात्रता पाहूनच प्रवेश अर्ज भरणे आवश्यक आहे. या परीक्षेस पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षाचे विद्यार्थीदेखील काही अटींच्या अधीन राहून अर्ज करण्यास पात्र राहतील. या परीक्षेचा निकाल परीक्षा झाल्यानंतर ऑनलाईन जाहीर करण्यात येईल. निकालानंतर या परीक्षेच्या उत्तरपत्रिकेची छायाप्रत मिळणार नाही किंवा याचे पुनर्मूल्यांकन होणार नाही. या पेट परीक्षेचे केंद्र मुंबई विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातच असेल. हे ऑनलाईन अर्ज विद्यापीठाच्या www.mu.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2T6t1wC
via IFTTT

Post a Comment

0 Comments