सिक्युरिटी गार्ड: ७ हजार पदांची बंपर भरती; पगार १७ हजार

मुंबई: महाराष्ट्र स्टेट सिक्युरिटी कॉर्पोरेशनने राज्यात सुरक्षा रक्षकांच्या पदांसाठी अर्ज मागवले आहेत. तब्बल सात हजार पदे भरली जाणार आहेत. या पदांसाठी शैक्षणिक पात्रता बारावी उत्तीर्ण हवी आहे. महाराष्ट्र स्टेट सिक्युरिटी कॉर्पोरेशनच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन अर्ज भरायचे आहेत. अर्ज भरण्याची अखेरची मुदत १० मार्च २०२० आहे. किमान वयोमर्यादा १८ वर्षे तर कमाल वयोमर्यादा २८ वर्षे आहे. इच्छुक उमेदवारांना बारावीत किमान ५० टक्के गुण असणं अनिवार्य आहे. कसा करायचा अर्ज? - MSSC चे अधिकृत संकेतस्थळ mahasecurity.gov.in वर जा - वर ‘Recruitment’ च्या लिंक वर क्लिक करा - आता नव्या पेजवर Apply Online For Post of या पर्यायावर क्लिक करा - क्लिक करताच अॅप्लिकेशन फॉर्मचं पेज उघडेल - आता तेथे विचारलेल्या डिटेल्स (तपशील) भरत जा - अर्ज [Register] केल्यानंतर उमेदवारास Application ID प्राप्त होईल. हा Application ID पुढील सर्व प्रक्रियेसाठी महत्वाचा असलेले उमेदवारांनी तो काळजीपूर्वक जतन करावा. - शुल्क भरल्यानंतर आपले छायाचित्र स्कॅन करून अपलोड करा. भरती प्रक्रियेचे शुल्क कसे भरायचे? भरती प्रक्रिया शुल्क दोन प्रकारे भरता येईल - अ) ऑनलाईन पेमेंट कार्यप्रणाली ब) बँक ट्रान्सफर पेमेंट कार्यप्रणाली आणखी वाचा -


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2uxws67
via IFTTT

Post a Comment

0 Comments