Also visit www.atgnews.com
बारावीनंतर काय? या ४ कारणांसाठी निवडा मॅनेजमेंट अभ्यासक्रम
मुंबई: बारावीचा टप्पा हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा असतो. या टप्प्यावरचेच उच्च शिक्षणासंदर्भातले निर्णय भवितव्यावर परिणाम करतात. इंजिनीअरींग, मेडिकलसारख्या पारंपरिक वाटा तर आहेतच, मात्र गेल्या काही वर्षांमध्ये (मॅनेजमेंट) अभ्यासक्रमांनाही खूप महत्त्व आले आहे. पुढील ४ कारणांसाठी हा उत्तम पर्याय ठरू शकतो :- सोपी प्रवेश प्रक्रिया व्यावसायिक अभ्यासक्रमांशी तुलना करता व्यवस्थापन अभ्यासक्रमांचे प्रवेश हे तसे सोपे असतात. बारावीतल्या गुणांवर हा प्रवेश ठरतो. मात्र कोणत्याही अतिरिक्त प्रवेश परीक्षेचा ताण नसतो. नोकरीची संधी BBA, BMS किंवा BBS सारख्या मॅनेजमेंट कोर्सनंतर नोकरीच्या खूप संधी उपलब्ध असतात. बँक, शासकीय संस्था, विमान कंपन्या, रुग्णालये, MNCs त्यांच्या दैनंदिन कामकाजासाठी मॅनेजमेंट पदवीधरांना जॉब्स देत असतात. स्पेशलायझेशनचा पर्याय निवडण्याचा फायदा म्हणजे तुम्ही पदवी घेता घेता विशिष्ट क्षेत्रात स्पेशलायझेशन करू शकता. उदा. मार्केटिंग, अॅडमिनिस्ट्रेशन आदी. स्वत:चा व्यवसाय मॅनेजमेंट पदवीधर स्वत:चा व्यवसायदेखील सुरू करू शकतो. तुम्ही हा अभ्यासक्रम शिकताना जी कौशल्ये आत्मसात कराल, त्याचा कोणत्याही व्यवसायासाठी उपयोगच होणार असतो. इंटर्नशीपमध्ये तुम्ही मिळवलेला अनुभवही येथे कामी येणार असतो.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/387dnX7
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments