करोना: धुळ्याचे दोन विद्यार्थी चीनमधून माघारी

मुंबई: विषाणूच्या फैलावानंतर चीनमधील वुहानमधून भारतात परतलेल्या विद्यार्थ्यांच्या पहिल्या गटात महाराष्ट्रातील दोन पीएचडीचे विद्यार्थी आहेत. हे दोघेही गुरुवारी चीनमधून दिल्ली विमानतळावर पोहोचले. गिरीश पाटील (२९) आणि चंद्रदीप जाधव (२९) अशी या दोन्ही विद्यार्थ्यांची नावे आहेत. वुहान विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्यापीठातील कॉलेज ऑफ मटेरिअल्स आणि मेटॅलर्जीमध्ये हे दोघे शिकत होते. त्यांनी आधी वुहानमध्येच थांबण्याचा निर्णय घेतला होता. त्यांचा पीएचडी अभ्यासक्रम २०१९ मध्ये सुरू झाला होता. त्यांचे प्रवेश निश्चित होण्याचीही ते वाट पाहत होते. दिल्ली विमानतळावर इतर विद्यार्थ्यांसोबत उतरल्या उतरल्या त्यांना चावला कॅम्प येथील क्वारंटाइन सेंटरमध्ये पाठवण्यात आले. तेथे पुढील १४ दिवस त्यांना निरीक्षणाखाली ठेवण्यात येईल. विषाणूची लागण नसल्याचे निश्चित झाल्यानंतरच त्यांना त्यांच्या घरी पाठवण्यात येणार आहे. पाटील आणि जाधव हे दोघेही धुळ्याचे विद्यार्थी आहेत. विद्यार्थ्यांना आणण्यासाठी भारताचे पहिले विमान चीनला गेले होते तेव्हा सहा भारतीय विद्यार्थ्यांनी विद्यापीठातच राहण्याचा निर्णय घेतला, त्यात या दोघांचा समावेश होता. पण हे सर्व सहा जण आता भारतात परतले आहेत. यापैकी एकाने माहिती दिली की विद्यापीठाने अधिकृतपणे रजा काही महिन्यांनी वाढवली आहे. त्यांना ना हरकत प्रमाणपत्रही देण्यात आले. त्यामुळे आता या विद्यार्थ्यांना विद्यापीठाचा ऑनलाइन क्लासही अटेंड करता येणार आहे. या मुलांनी आधी असा दावा केला होता की ते चीनच्या या शहरात करोनाच्या जीवघेण्या फैलावानंतरही निश्चिंत आहेत. मात्र करोनाचा कहर वाढत गेला आणि त्यांना भारतात परतण्यावाचून पर्याय उरला नाही. त्यांच्या कुटुंबीयांनीही आता सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. शिकवण्याचा अनुभव आणि अनेक संशोधन पेपर प्रकाशित होऊनही महाराष्ट्रातील विद्यापीठांनी पाटील आणि जाधव यांचे पीएचडी अर्ज फेटाळून लावले होते. त्यानंतर दोघांनी चीनला जाऊन पीएचडी करण्याचा निर्णय घेतला. हेही वाचा :-


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2w93OsG
via IFTTT

Post a Comment

0 Comments