बारावी परीक्षा: नेहमी विचारले जाणारे प्रश्न

मुंबई: राज्य मंडळामार्फत घेण्यात येणारी उद्यापासून सुरू होत आहे. परीक्षा म्हटलं की काही प्रश्न विद्यार्थी वारंवार विचारतात. याबाबतची उत्तरे बोर्डाच्या समुपदेशकांकडून घेऊन आम्ही तुमच्यासाठी येथे देत आहोत - बोर्ड हेल्पलाइन क्रमांक - ०२२ - २७८९ ३७५६ आणि ०२२ - २७८८१०७५ परीक्षेपूर्वी नेहमी विचारले जाणारे प्रश्न :- > बोर्डाच्या परीक्षेला रायटिंग पॅड सोबत नेले तर चालेल का? उत्तर - परीक्षेला रायटिंग पॅड अवश्य न्यावे. त्यावर उत्तरपत्रिका ठेवून लिहू शकता. मात्र हे रायटिंग पॅड पारदर्शकच असायला हवे, याची काळजी घ्यावी. > उत्तरपत्रिकेवर कोणत्या रंगाच्या पेनने लिहावे? उत्तर - काळ्या किंवा निळ्या शाईचा बॉल पाइंट पेन प्राधान्याने वापरावा. नेहमी सोबत अतिरिक्त एक ते दोन पेन, रिफिल्स ठेवाव्यात. > जेल पेनने पेपर लिहिला तर चालेल का? - जेल पेनची शाई पसरते, त्याने लिखाणाचा वेगही कमी होतो. त्यामुळे शक्यतोवर बॉल पॉइंट पेनच वापरावे. > शाळेच्या गणवेशातच परीक्षेसाठी जायचं का? उत्तर: दहावीच्या किंवा कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शाळेच्या गणवेशातच परीक्षेला जावे असं बंधन नसतं. > हॉलतिकिटवर स्टॅम्प हवा का? उत्तर: परीक्षेचे हॉलतिकिट आधी बोर्डाकडून शाळांना पाठवले जात असे. मात्र आता शाळा/कनिष्ठ महाविद्यालय विद्यार्थ्यांचे हॉलतिकिट ऑनलाइन डाउनलोड करतात. या हॉलतिकिटावर शाळेच्या मुख्याध्यापकांची / कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्यांची सही आणि शिक्का असणे आवश्यक आहे. व्हॉट्स अॅपवर आलेल्या माहितीवर विश्वास ठेवायचा का? उत्तर: व्हॉट्स अॅपवर आयत्या वेळी कोणत्याही प्रकारचा गैरसमज निर्माण करणारा मेसेज आला तर त्याकडे अजिबात लक्ष देऊ नये आणि पॅनिक होऊ नये.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2P1M2xQ
via IFTTT

Post a Comment

0 Comments