शाहरुखच्या नावे पीएचडी स्कॉलरशीप!

मुंबई: बॉलिवूडचा सुपरस्टार याच्या नावे यंदापासून शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. 'शाहरुख खान ला ट्रोब यूनिवर्सिटी पीएचडी स्कॉलरशिप' ही पहिली स्कॉलरशीप केरळच्या एका विद्यार्थिनीला मिळाली आहे. शाहरुखच्याच हस्ते मुंबईत एका कार्यक्रमात या विद्यार्थिनीचा गौरव करून तिला ही शिष्यवृत्ती देण्यात आली. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये मेलबर्नमधील फिल्म फेस्टिव्हलला शाहरुखने हजेरी लावली होती. तेव्हा ला ट्रोब युनिव्हर्सिटीने त्याच्या नावाच्या शिष्यवृत्तीची घोषणा केली होती. 'एका शिष्यवृत्तीला माझं नाव दिलं जाणं हा त्या शिष्यवृत्तीचा नव्हे तर माझा सन्मान आहे,' असं शाहरुख यावेळी म्हणाला. शिक्षणाबद्दल त्याला असलेली कळकळ त्याच्या भाषणातून व्यक्त झाली. तो म्हणाला, 'मी शिक्षणात विश्वास ठेवतो. मला वाटतं शिक्षणच एखाद्या देशाचा, राज्याचा, शहराचा, कुटुंबाचा विकास करू शकतं. शिक्षण ही एक निरंतर प्रक्रिया आहे. आयुष्यभर शिकत राहणं महत्त्वाचं असतं.' केरळच्या त्रिसूर येथील गोपिका कोट्टनतरयिल भसी हिने हि स्कॉलरशीप पटकावली आहे. देशभरातील ८०० विद्यार्थिनींमधून गोपिकाची निवड करण्यात आली आहे. गोपिका अॅनिमल सायन्स, इकॉलॉजी आणि मॉलिक्युलर स्टडीजच्या माध्यमातून शेतीचा अभ्यास करत आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2Vwq0Hx
via IFTTT

Post a Comment

0 Comments