Also visit www.atgnews.com
यूपीएससीने आणला नवा टाय-ब्रेकिंग नियम
मुंबई: केंद्रीय लोकसेवा आयोगाने परीक्षेसाठी नव्याने टाय-ब्रेकिंग नियम जारी केले आहेत. जेव्हा दोन किंवा अधिक उमेदवारांना सारखेच गुण मिळतात तेव्हा हे नियम लागू होतात. आयोगाने यंदा नागरी सेवा परीक्षेसाठी दोन फिल्टरवाले नियम तयार केले आहेत. यानुसार समान गुण असणाऱ्या दोन उमेदवारांमध्ये आणि गुणांनुसार किंवा मग वयानुसार रँक ठरवला जाईल. कसा ठरवणार रँक? नियम क्रमांक १ - जर दोन किंवा दोनपेक्षा अधिक उमेदवारांना समान गुण असतील तर उमेदवारांच्या अनिवार्य पेपर आणि पर्सनालिटी चाचणीचे गुण एकत्र करून ज्याचे गुण अधिक त्याला जास्त रँक मिळेल. नियम क्रमांक २ - जर दोन्ही उमेदवारांचे अनिवार्य पेपर आणि पर्सनालिटी चाचणीचे गुण एकत्र करूनही समान झाले तर वयाचा निकष लावला जाईल. ज्याचे वय अधिक त्याला दोघांपैकी जास्त रँक मिळणार आहे. हा नियम २८ ऑगस्ट २०१९ नंतर ज्या परीक्षांची अधिसूचना जारी झाली आहे, त्यांना हा टायब्रेकिंग रुल लागू होणार आहे. यासंदर्भातली अधिसूचनी यूपीएससीच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. इंजिनिअरींग सर्व्हिस परीक्षा, संयुक्त भू-शास्त्रज्ञ परीक्षा, एनडीए आणि नौदल अकादमी परीक्षा आणि नागरी सेवा परीक्षेच्या अधिसूचना २८ ऑगस्ट २०१९ नंतर जारी झाल्या आहेत.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2T9Pnxj
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments