Also visit www.atgnews.com
लॅटव्हियामध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्याचे प्रयत्न
मुंबई: विषाणूच्या प्रादुर्भावामुळे विमानसेवा बंद असल्याने युरोप खंडातील लॅटव्हियाची राजधानी रीगा विमानतळावर भारतातील ३७ विद्यार्थी अडकले आहेत. त्यांना मायदेशी परतण्यासाठी केंद्र शासनाशी संपर्क सुरु आहे. यासंदर्भात पंतप्रधान कार्यालय, विदेश मंत्रालय तसेच मुख्यमंत्री कार्यालय यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. सामंत म्हणाले, रीगा येथे अडकलेल्या विद्यार्थ्यांना तिथे कोणत्याही स्वरूपाची मदत अथवा आरोग्याच्या दृष्टीने कोणत्याही मूलभूत सुविधा उपलब्ध होत नसल्याकारणाने त्या विद्यार्थ्यांनी भीतीपोटी माझ्याशी संपर्क केला आहे. विद्यार्थ्यांशी दूरध्वनीवर संपर्क झाला. सर्व विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्यासाठी राज्यशासन केंद्र शासनाच्या मदतीने सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. भारतातील ३७ विद्यार्थी असून महाराष्ट्रातील ८ विद्यार्थ्यांचा यात समावेश आहे. या सर्वांना मायदेशी परतण्यासाठी तातडीने मदत करण्यात येईल त्यामुळे विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी काळजी करू नये,शासन आपल्याला मदत करेल असा विश्वासही विध्यार्थ्यांना सामंत यांनी दिला.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/39lNBy0
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments