करोना: कोणत्या शाळा, कधीपर्यंत बंद?...पाहा

मुंबई: देशातल्या अनेक राज्यांनी विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र सरकारने शुक्रवारी पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या. मात्र राज्यातल्या अन्य ठिकाणच्या शाळा सुरू आहेत. काही शाळांनी स्वत:च्या स्तरावर कामकाच बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पाहूयात कुठल्या शाळा कधीपर्यंत बंद आहेत - मुंबईतल्या किमान १० मोठ्या शाळांनी करोनाच्या पार्श्वभूमीवर कामकाज बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या शाळा कोणत्या पाहू - विबग्योर समूह लीलावतीबाई पोदार, सांताक्रूझ, HVB ग्लोबल अकॅडमी, मरीन ड्राइव्ह चॅम्पियन स्कूल, फोर्ट पेटीट मुलींची शाळा, वांद्रे न्यू होरायझन स्कॉलर्स स्कूल, ठाणे सुनीतीदेवी सिंघानिया स्कूल, ठाणे कॅथेड्रल अँड जॉन कॅनन स्कूल, फोर्ट उत्पल संघवी ग्लोबल स्कूल, जुहू बालमोहन विद्यामंदिर, दादर याशिवाय पिंपरी-चिंचवड, पुणे शहरातील सर्व शाळा आणि महाविद्यालये पुढील सूचना मिळेपर्यंत बंद आहेत. मात्र सर्व ठिकाणी दहावी, बारावीच्या परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसारच होणार आहेत. अन्य राज्यातील शाळा कधीपर्यंत बंद? गोवा - शाळा, महाविद्यालये ३१ मार्चपर्यंत बंद उत्तर प्रदेश - १३ ते २२ मार्च छत्तीसगड - ३१ मार्च दिल्ली - ३१ मार्च हरयाणा - ३१ मार्च


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2TPXRKs
via IFTTT

Post a Comment

0 Comments