Also visit www.atgnews.com
दिल्लीतील पहिली ते आठवीचे विद्यार्थी प्रमोट
करोना विषाणूच्या भारतातील फैलावामुळे संपूर्ण देश १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊनच्या स्थितीत आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांच्या वार्षिक परीक्षांचे आयोजन एप्रिलनंतर करणं कठीण आहे, हे लक्षात आल्यानंतर दिल्ली सरकारने नर्सरी ते आठवीपर्यंतच्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रमोट करण्याचा निर्णय अखेर सोमवारी जाहीर केला. महाराष्ट्र, उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांनी हा निर्णय यापूर्वीच जाहीर केला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह उपमुख्यमंत्री आणि दिल्लीचे शिक्षणमंत्री मनीष सिसोदिया यांनी डिजीटल प्रेस कॉन्फरन्समध्ये हा निर्णय जाहीर केला. याशिवाय बारावीच्या विद्यार्थ्यांचे डिजीटल वर्ग एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होणार असल्याचीही माहिती दिली. No detention Policy अंतर्गत दिल्लीतल्या सर्व सरकारी शाळामधील आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना परीक्षेशिवायच पुढील वर्गात पाठवण्यात येणार आहे. दिल्लीत आठवीपर्यंतच्या इयत्तांतील विद्यार्थ्यांची परीक्षा ईशान्य दिल्लीतील हिंसाचार आणि त्यानंतर करोना व्हायरसचा प्रादुर्भाव यामुळे होऊ शकली नाही, अशी माहित सिसोदिया यांनी दिली. बारावीच्या डिजीटल वर्गांबद्दल तसेच आठवीपर्यंतच्या वर्गांबद्दलही ते बोलले की विद्यार्थ्यांना SMS किंवा IVR द्वारे इंटरनल अॅक्टिव्हिटी असाइन केली जाईल. नंतर शाळा उघडल्यावर या अॅक्टिव्हिटीचा वापर इंटरनल असेसमेंटसारखा केला जाईल. बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात ऑनलाइन वर्ग सुरू केले जातील. इंटरनेट पॅक खरेदी करण्यासाठी सरकार या विद्यार्थ्यांना निधी देईल. दररोज विद्यार्थी दोन विषय शिकतील. विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर रजिस्टर करावे लागेल. यासाठी त्यांना लिंक पाठवण्यात येईल.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3ar0bNT
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments