Also visit www.atgnews.com
एम्सच्या पीजी प्रवेश परीक्षा स्थगित
अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अर्थात एम्सने मेडिकल पीजी एन्ट्रन्स टेस्टसह अन्य परीक्षा स्थगित केल्या आहेत. करोना व्हायरसमुळे देशभर लॉकडाऊन आहे परिणामी एम्स प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. एम्सच्या पीजी मेडिकल कोर्सेसची प्रवेश परीक्षा ३ मे २०२० रोजी होणार होती. ही परीक्षा जुलै २०२० सत्रासाठी होणार होती. एम्स वर्षातून दोन वेळा पीजी प्रवेश परीक्षांचे आयोजन करते. या परीक्षांच्या माध्यमातून एम्सचे एम.डी., एम.एस. सहा वर्षीय DM कोर्स, ६ वर्षांचे एम. सीएच. कोर्स आणि MDS कोर्स या अभ्यासक्रमांना प्रवेश मिळतो. या परीक्षेत एक पेपर असतो. याच एमडी / एमएससाठी २०० वैकल्पिक प्रश्न असतात आणि एमडीएससाठी ९० वैकल्पिक प्रश्न असतात. पीजी प्रवेश परीक्षेसह अन्य परीक्षाही एम्सने स्थगित केल्या आहेत. यात प्रोफेशनल, फायनल आणि सप्लीमेंट्री परीक्षांचा समावेश आहे. या परीक्षांचे आयोजन मे २०२० मध्ये केले जाणार होते. एम्सने या सर्व परीक्षांसंदर्भात एक नोटीसही जारी केली आहे. या परीक्षा नंतर साधारणपणे कधी आयोजित केल्या जाऊ शकतील याची माहितीही एम्सने दिली आहे. सर्व परिस्थिती सुरळीत असती तर २७ मार्च रोजी नीट युजी परीक्षेचे अॅडमीट कार्ड जारी होणार होते. नीट युजी परीक्षा स्थगित केली वा नाही याबाबत कोणती माहिती नाही. नीट यूजी परीक्षाही स्थगित होण्याची दाट शक्यता आहे. एम्सच्या संकेतस्थळावर जाण्याासठी हेही वाचा -
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3dy149l
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments