Also visit www.atgnews.com
JEE चा अभ्यास असा करा ऑनलाइन
कोलकाता: JEE Mains आणि JEE Advanced या दोन्ही परीक्षा देशातील लॉकडाऊन परिस्थितीमुळे लांबणीवर पडल्या आहेत. या परीक्षा आता मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात होणार आहेत. IIT खरगपूरने विद्यार्थ्यांना प्रिपरेशन मोड्युल्स तयार केले आहेत आणि ते नॅशनल डिजीटल लायब्ररीवर उपलब्ध करून दिले आहेत. परिणामी विद्यार्थ्यांना याचा ऑनलाइन लाभ घेता येणार आहे. नॅशनल डिजीटल लायब्ररी ही देशातील सर्वात मोठी ऑनलाइन लायब्ररी आहे. ही आयआयटी खरगपूर संस्थेतर आहे. लॉकडाऊन काळात विद्यार्थ्यांना या लायब्ररीची मोठी मदत मिळणार आहे. बहुतांश विद्यार्थी जेईईच्या तयारीसाठी खासगी ट्युशन्सवर अवलंबून असतात. लॉकडाउनमुळे सर्व कोचिंग क्लासेस बंद आहेत, त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होऊ नये म्हणून हा ऑनलाइन अभ्यास उपलब्ध करून देण्याचा संस्थेचा मानस आहे. NDLI च्या प्लॅटफॉर्मवर विद्यार्थ्यांना हे प्रिपरेटरी मोड्युल्स मिळतील. त्यासाठी NDLI च्या https://www.ndl.gov.in/ किंवा https://ift.tt/1K4jHkM या संकेतस्थळावर जा. विद्यार्थी NDLI च्या मोबाईल अॅप्लिकेशनवरही लॉग ऑन करू शकता. NDLI च्या संकेतस्थळाने ' Outbreak: Study from Home' हा विशेष विभाग तयार केला आहे. यावर JEE Advanced च्या १२ वर्षांच्या प्रश्नपत्रिका, सराव प्रश्न आणि JEE मेन्सचा गेल्या पाच वर्षांचा कंटेंट उपलब्ध आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3dCin9f
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments