UPSC: ८५ पदांसाठी नोकरभरती

नवी दिल्ली: केंद्रीय लोकसेवा आयोगाने असिस्टंट इंजिनीअर, उपसंचालक आणि अन्य अशा एकूण ८५ पदांसाठी अर्ज मागवले आहेत. इच्छुक उमेदवार केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या दिलेल्या प्रारुपानुसार २ एप्रिल २०२० पर्यंत अर्ज करू शकतात. लोकसेवा आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर याबाबतची अधिक माहिती आहे. पदांची संख्या अशी आहे - चीफ डिझाइन इंजिनीअर - १ पद उप अधीक्षक -२ पदे असिस्टंट इंजिनीअर - ६३ पदे असिस्टंट वेटर्नरी ऑफिसर - १ पद असिस्टंट डायरेक्टर - १३ पदे असिस्टंट एम्प्लॉयमेंट ऑफिसर - २ पदे उपसंचालक - ३ पदे शैक्षणिक पात्रता चीफ डिझाइन इंजिनीअर- मान्यता प्राप्त विद्यापीठातून मेकॅनिकल इंजीनिअरिंग मधील पदवी वयोमर्यादा: ५० वर्ष डिप्टी डायरेक्टर - पोस्ट ग्रॅज्युएट सह मास्टर्स डिग्री किंवा हिस्ट्री/सोशियोलॉजी/इकोनॉमिक्स/पॉलिटिकल सायन्स/पब्लिक अॅडमिनिस्ट्रेशन/जॉग्रफी/लॉ मध्ये समकक्ष पोस्ट ग्रेजुएट डिप्लोमा किंवा समकक्ष योग्यता. वयोमर्यादा: ४३ वर्षे शैक्षणिक योग्यतेबाबत अधिक माहिती संकेतस्थळावर उपलब्ध आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3aaFWUq
via IFTTT

Post a Comment

0 Comments