Also visit www.atgnews.com
आयआयटी दिल्ली मजुरांच्या मदतीला; उभारला निधी
नवी दिल्ली: व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत आहे. देशात लॉकडाऊनची स्थिती आहे. लोक आपापल्या घरात बंद आहेत. बांधकामापासून वाहतुकीपर्यंत सर्व कामं बंद आहेत. परिणामी हातावर पोट असणाऱ्या मजुरांचे हाल होत आहेत. या मजुरांच्या मदतीसाठी पुढे आली आहे. या मजुरांचे खाण्या-पिण्याचे हाल होत आहेत. आयआयटी दिल्लीने लॉकडाऊनच्या काळात आर्थिक आणि प्रत्यक्ष उपासमार होणाऱ्या या मजुरांसाठी एक फंड रेझिंग कॅम्पेन लॉन्च केलं आहे. बांधकाम मजूर, कंत्राटी कामगार, रिक्षाचालक, धोबी, सफाई कामगार आदींच्या कुटुंबांच्या मदतीसाठी आयआयटी दिल्लीने हा उपक्रम सुरू केला आहे. यासाठी संस्थेने आपल्या संकेतस्थळावर एक लिंक दिली आहे. याद्वारे निधी जमा केला जाऊ शकतो. आयआयटी दिल्लीच्या या आवाहनाला नागरिकांचा जोरदार प्रतिसादही मिळत आहे. एका आठवड्यात सुमारे ९ लाख २० हजार रुपये जमा झाले आहेत. याव्यतिरिक्त च्या विद्यार्थ्यांनी १ लाख २० हजार रुपये जमा केले आहेत. या विद्यार्थ्यांच्या निधीतून कॅम्पसच्या आसपासच्या रिक्षा चालकांची मदत केली जाणार आहे. निधीचा विनियोग कसा करणार याबाबतची माहिती आयआयटीच्या संचालकांनी दिली आहे. त्यांनी सांगितलं आहे, 'करोना व्हायरसमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे ज्यांची आबाळ होत आहे, अशा वर्गापर्यंत' ही मदत पोहोचवली जाईल. भविष्यातही मेडिकल इमर्जन्सीसह अन्य आपत्कालीन स्थितींमध्ये हा निधी लोकांची मदत करण्याच्या कामी येईल.' आयआयटी दिल्लीच्या संकेतस्थळावर जाण्यासाठी
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3azby6x
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments