Also visit www.atgnews.com
लॉची सीईटी पुन्हा लांबणीवर; 'ही' नवी तारीख
सीएलएटी परीक्षेची तारीख २०२०: कॉमन लॉ अॅडमिशन टेस्ट ( सीएलएटी ) परीक्षा पुन्हा लांबणीवर पडली आहे. या परीक्षेची तारीख यापूर्वीदेखील लांबणीवर पडली होती. यापूर्वी ही परीक्षा २४ मे रोजी आयोजित होणार होती. पण ही परीक्षा आता २१ जून २०२० रोजी घेण्यात येणार आहे. करोना विषाणूच्या संसर्गामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. देशातील २२ राष्ट्रीय विधी विद्यापीठांमधील पदवीपूर्व आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी ही सामायिक प्रवेश परीक्षा घेतली जाते. परीक्षेसाठी अर्ज १८ मे २०२० पर्यंत करता येतील. परीक्षेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया १ जानेवारी २०२० रोजी सुरू झाली आहे. परीक्षा २१ जून रोजी दुपारी ३ ते सायंकाळी ५ या वेळेत घेण्यात येणार आहे. एखाद्या उमेदवाराला परीक्षेसंबंधित कोणताही प्रश्न विचारायचा असेल तर तो आपले प्रश्न clat@consortiumofnlus.ac.in या अधिकृत इमेल आयडीवर किंवा सर्व कामकाजाच्या दिवशी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत ०८०-४७१६२०२० या क्रमांकावर फोन करून विचारू शकतो. परीक्षेच्या वेळापत्रकबाबत अधिसूचनाही जारी करण्यात आली आहे. सीएलएटी परीक्षेसाठी अर्ज Consortiumofnlus.ac.in या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन भरता येईल. हेही वाचा:
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3bvu9AX
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments