Also visit www.atgnews.com
काय सांगतंय सीबीएसईचं सर्क्युलर...वाचा
केंद्रीय माध्यमिक शिक्षा मंडळ अर्थात बोर्डाने दहावी आणि बारावीच्या परीक्षांसदर्भात एक महत्त्वाचं परिपत्रक जारी केलं आहे. या परिपत्रकात हे स्पष्ट करण्यात आलं आहे की दहावी, बारावीच्या परीक्षांसंदर्भात बोर्डाच्या आधीच्या निर्णयात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. दरम्यान, सीबीएसई बोर्डाने ट्विट करत म्हटलंय, 'दहावी सीबीएसई परीक्षांसंदर्भात अनेक शक्यता व्यक्त केल्या जात आहे. मात्र आम्ही याचा पुनरुच्चार करतो की बोर्ड दहावी आणि बारावीच्या २९ मुख्य विषयांच्या परीक्षा घेण्याच्या आपल्या निर्णयावर ठाम आहे. यासंदर्भातलं परिपत्रक बोर्डाने १ एप्रिल २०२० रोजी जारी केलं होतं.' १ एप्रिलच्या परिपत्रकानुसार दहावीच्या उर्वरित परीक्षा केवळ ईशान्य भागात होणार आहेत. बारावीच्या परीक्षा मात्र देशभरात होणार आहेत. दहावीच्या ईशान्य दिल्लीतील परीक्षा आणि बारावीच्या परीक्षा लॉकडाऊननंतर परिस्थिती सामान्य झाल्यानंतर आयोजित केल्या जातील. विद्यार्थ्यांना परीक्षेच्या किमान दहा दिवस आधी परीक्षेसंदर्भातल्या सूचना मिळतील. दरम्यान, मंगळवारी केंद्रीय मनुष्यबळ मंत्री रमेश पोखरियाल यांनीही सांगितले होते की सीबीएसईच्या परीक्षा होणार आहेत. तसेच ज्या परीक्षा झाल्या आहेत, त्यांच्या उत्तरपत्रिका तपासणीचे कामही सुरू होईल.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2SjDzrB
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments