स्टाफ सिलेक्शन परीक्षांचे निकाल लांबणीवर

कर्मचारी भरती आयोग (स्टाफ सिलेक्शन कमिशन) ने परीक्षांच्या निकालांसंबधी एक परिपत्रक आपल्या अधिकृत संकेतस्थळावर जारी केली आहे. () च्या या परिपत्रकानुसार, ज्युनिअर इंजिनीअर २०१८ पेपर २, एमटीएस २०१९ पेपर २ आणि सीजीएल २०१८ टीयर ३ चा निकाल स्थगित करण्यात आला आहे. याआधी ज्युनिअर इंजिनीअर २०१८ पेपर २ चा निकाल ९ एप्रिल २०२० जाहीर होणार होता. मल्टी टास्किंग स्टाफ म्हणजेच MTS 2019 चा पेपर २ चा निकाल ३० एप्रिल रोजी जाहीर होणार होता तर CGL 2018 टीअर ३ चा निकाल ८ मे २०२० रोजी जाहीर होणार होता. आयोगाने सांगितलं की करोना व्हायरस मुळे निर्माण झालेली स्थिती लक्षात घेऊन या परीक्षांचे निकाल लांबणीवर टाकण्यात येत आहेत. निकालाच्या नव्या तारखा येत्या काही दिवसात परिस्थितीचा अंदाज घेऊन जाहीर केल्या जातील. एसएससीचा MTS 2019 पेपर 2 आणि CGL 2018 Tier 3 चे उमेदवार निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. UFM इमॅजनरीच्या पार्श्वभूमीवर निकाल अयोग्य घोषित होईल अशी त्यांना भीती आहे. सीएचएसएल २०१८ च्या टिअर २ परीक्षेप्रमाणे या परीक्षांमध्येही पत्र लिहायला सांगितलं होतं. अनेक उमेदवारांनी XYZ आणि १२३ असा काल्पनिक पत्ता लिहिला पण आयोगाने ही अनफेअर प्रॅक्टिस मानून उमेदवारांना अनुत्तीर्ण केलं. यासंदर्भात अनेक नाराज उमेदवारांनी आयोगाविरोधात केंद्रीय मंत्र्यांकडे तक्रार केली आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2VRfqJW
via IFTTT

Post a Comment

0 Comments