Also visit www.atgnews.com
लॉकडाऊनमध्ये कुठली पुस्तकं वाचताहेत सेलिब्रिटी?
लॉकडाऊनमध्ये प्रत्येक जण आपापल्या परीने घरीच राहून अधिकाधिक सकारात्मक पद्धतीने वेळ कसा घालवता येईल हे पाहत आहे. अनेक लोक चित्रकला, स्वयंपाक, संगीत, वाचन असे आपले एरव्ही थोडे बाजूला पडलेले छंद जोपासत आहेत. काहींना स्वत:मधली क्रिएटिव्हीटी बाहेर काढण्याची संधी मिळाली आहे. या काळात वाचन ही अशी गोष्ट आहे, जिच्यावर सर्व वयोगटातल्या लोकांनी विशेष भर दिला आहे. सेलिब्रिटीदेखील आपल्या आवडीच्या पुस्तकांचा फडशा पाडण्याच्या मागे लागले आहेत. कोणता कोणतं पुस्तक वाचतोय माहितीय? या स्टार्सनी स्वत:च आपण वाचत असलेल्या पुस्तकांची माहिती आपल्या चाहत्यांना दिला आहे. अभिनेता अमिताभ बच्चन, श्रद्धा कपूर, राजकुमार राव, चंकी पांडे यांच्यासह अनेक सिनेकलाकारांनी ट्विट करत ते वाचत असलेल्या पुस्तकांबद्दल सांगितले आहे. केंद्रीय मनुष्यबळ मंत्री रमेश पोखरियाल यांच्या एका मोहिमेला समर्थन म्हणून हे ट्विट सेलिब्रिटींनी केले आहेत. केंद्रीय मंत्र्यांच्या या मोहिमेचं नाव आहे 'माय बुक माय फ्रेंड'. ट्विटरवर #MyBookMyFriend या हॅशटॅगसह हे सेलिब्रिटी त्या पुस्तकाबद्दल सांगत आहे. ज्याने लॉकडाऊनच्या खडतर काळात त्यांना मोलाची साथ दिली आहे. सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी केंद्रीय मनुष्यबळ मंत्री रमेश पोखरियाल यांचे आभारही मानले आहेत. पोखरियाल यांनीही या मोहिमेत सहभागी झाल्याबद्दल आणि लोकांना प्रेरित केल्याबद्दल सर्वांचे आभार मानले आहेत. कोण काय वाचतंय? अमिताभ बच्चन - टॉकिंग टू माय डॉटर (Talking to My Daughter) आणि द अनार्की (The Anarchy) चंकी पांडे - कसीनो रोयाल : द बर्थ ऑफ जेम्स बॉन्ड (Casino Royal : The birth of James Bond) श्रद्धा कपूर - द सीक्रेट प्रिंसिपल्स ऑफ जीनियस (The Secret Principles of Genius) राजकुमार राव - लियोनार्दो दा विंसी : दि बायोग्राफी प्रसून जोशी - सॉलीट्यूड : अ रिटर्न टू द सेल्फ (Solitutde: A return to the self)
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2zxq017
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments