विद्यार्थ्यांची लॉकडाऊनच्या काळातली १०० टक्के उपस्थिती लागणार

देशभरातील विद्यापीठांचे नवीन शैक्षणिक सत्र सप्टेंबरमध्ये सुरू होणार आहे. लॉकडाऊनमुळे महाविद्यालयांचे शैक्षणिक सत्र दोन महिने उशिरा सुरू होत आहे. दरम्यान महाविद्यालये बंद राहिली आहेत, परंतु या कालावधीत सर्व विद्यार्थ्यांची उपस्थिती १०० टक्के नोंदवली जाईल. विद्यापीठांमध्ये नवीन अधिवेशन केव्हा आणि कसे सुरू करावे यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) विशेष समिती गठीत केली होती. यूजीसीने गठित केलेल्या या सात सदस्यांच्या समितीने परीक्षेसंबंधित प्रश्न व शैक्षणिक कॅलेंडरबाबतचा अहवाल सादर केला आहे.यूजीसीला सादर केलेल्या अहवालात समितीने म्हटले आहे की लॉकडाऊन दरम्यान सर्व विद्यार्थ्यांची उपस्थिती १०० टक्के नोंदविली जावी. विद्यार्थ्यांची पूर्ण उपस्थिती यासाठी नोंदविली जात आहे जेणेकरून सर्व विद्यार्थी अंतिम परीक्षा देऊ शकतील. समितीने आपल्या शिफारशीत म्हटले आहे की, देशभरातील सर्व महाविद्यालयांनी आठवड्यातून सहा दिवस वर्ग घ्यावेत. देशभरातली लॉकडाऊनची परिस्थिती लक्षात घेता देशात उच्च शिक्षणाचे नवे अधिवेशन जुलैऐवजी सप्टेंबरपासून घेण्यात येणार आहे. शनिवारी महाविद्यालय सुरू ठेवण्याबाबतही समितीने शिफारस केली आहे. यूजीसीच्या या समितीचे अध्यक्ष हरियाणा केंद्रीय विद्यापीठाचे कुलगुरू आर. सी. कुहाड होते. सदस्यांमध्ये ए.सी. पांडे, वनस्थली विद्यापीठाचे कुलगुरू आदित्य शास्त्री आणि पंजाब विद्यापीठाचे कुलगुरू राज कुमार यांचा समावेश होता. प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे सत्र सप्टेंबरमध्ये तर द्वितीय आणि तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी हे शैक्षणिक सत्र १ ऑगस्टपासून सुरू करता येईल, अशीही समितीची शिफारस आहे. हेही वाचा:


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3bQNEUI
via IFTTT

Post a Comment

0 Comments