जेईई: 'या' तारखांना होऊ शकतात परीक्षा

जेईई मेन आणि अॅडव्हान्स्ड परीक्षा देशातील लॉकडाऊन स्थितीमुळे लांबणीवर पडल्या आहेत. मात्र आता लॉकडाऊनचा दुसरा टप्पा संपता संपता या परीक्षांच्या तारखांबाबत काही हिंट्स मिळत आहेत. खुद्द जेईई अॅडव्हान्स्डच्या नियोजन अध्यक्षांनी याबाबतची माहिती दिली आहे. जेईई अॅडव्हान्स्डचे ऑर्गनायझिंग चेअरमन सिद्धार्थ पांडेय एज्युकेशन टाइम्सशी बोलताना म्हणाले, 'जेईई अॅडव्हान्स्डच्या आयोजनासाठी जेईई मेननंतर सुमारे दोन ते तीन आठवड्यांचा काळ मध्ये असणं आवश्यक असतं. त्यामुळे जेईई मेनच्या तारखांवर जेईई अॅडव्हान्स्डच्या तारखा ठरवता येतील.' या परीक्षा कधी होणार, आयआयटी आणि एनआयटी नवं शैक्षणिक सत्र कधी सुरू करणार याबाबत पांडेय यांनी माहिती दिली. सिद्धार्थ पांडेय म्हणाले, '२० ते २२ जूनदरम्यान जेईई मेन २०२० चं आयोजन करण्याचा प्रयत्न सुरू आहे. यानंतर १२ जुलै रोजी जेईई अॅडव्हान्स्डचंदेखील आयोजन करता येईल. मात्र या संभाव्य तारखा आहेत. प्रत्यक्ष परिस्थीती पाहून पुढील निर्णय घेण्यात येतील.' नवं सत्र कधी? यावर्षी सर्व आयआयटी आणि एनआयटीमध्ये नवं शैक्षणिक सत्र सुरू होईपर्यंत डिसेंबर महिना उजाडण्याची चिन्हे आहेत. या संस्थांमध्ये परदेशी विद्यार्थी देखील प्रवेश घेत असतात. या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रवेशापूर्वी एक महिना आधी देशा येण्यास सांगण्यात आले आहे, जेणेकरून त्यांना आधी क्वारंटाइन करता येईल.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2KD9AXo
via IFTTT

Post a Comment

0 Comments