केव्हा धुवाल हात? IIT दिल्लीचा हा अॅप सांगणार

व्हायरसच्या संक्रमणाचे संकट अवघ्या जगावर आहे. यातून स्वत:चा बचाव करण्यासाठी जे बेसिक उपाय सांगितले जात आहेत, त्यापैकी एक साधा उपाय आहे तो म्हणजे सतत हात धूत राहाणे. अनेक जण खूपच सजग झाले आहेत या बाबतीत. पण काही महाभाग असेही आहेत जे हात धूत नाहीत. चक्क विसरतात. कुठून बाहेरून आलो किंवा कुठल्या बाहेरच्या वस्तूला हात लावला तर हात धुणं हे या करोना संक्रमणाच्या काळात अत्यावश्यक आहे. पण याची चिंता आता सोडा.. कारण ती जबाबदारी एका अॅपने घेतलीय. आयआयटी दिल्लीने हा अनोखा अॅप आणलाय जो हात धुवायची आठवण करतो आपल्याला. जशी याची जबाबदारी तसंच याचं नाव - (Wash Karo) आयआयटी दिल्ली इन्स्टिट्यूटने जागतिक आरोग्य संघटनेची मार्गदर्शक तत्वे ध्यानात घेऊन हे अॅप विकसित केलं आहे. ते हिंदी आणि इंग्रजी अशा दोना भाषांमध्ये उपलब्ध आहे. लवकरच ते पंजाबी, उर्दू, तामिळ आणि तेलगु भाषेतही येणार आहे. आयआयटी दिल्लीचे कॉम्प्युटेशनल बायोलॉजीचे प्राध्यावर तवप्रितेश सेठी आणि कॉम्प्युटर सायन्सचे प्राध्यापक पोन्नूरंगम कुमारगुरू यांनी मिळून हे अॅप बनवलं आहे. सेठी यांनी सांगितलं की, हे अॅप्लिकेशन वेळोवेळी हात धुण्याची आठवण तर करून देतंच, शिवाय करोना व्हायरलसंबंधीच्या सर्व खोट्या बातम्या, गैरसमजुतींपासूनही वाचवतं. याबाबत सेठी म्हणाले, 'यात सिम्प्टम ट्रॅकर लावला आहे, जो याला वापरणाऱ्यात करोना व्हायरसची लक्षणे आहेत का याचा शोध घेतो. जेणेकरून तुम्ही वेळोवेळी चाचणी कराल आणि सुरक्षित राहाल. या अॅपद्वारे तुम्ही करोना संबंधित तुमच्या प्रश्नांची उत्तरेदेखील मिळवू शकता. याची चॅटबॉट सुविधा तुम्हाला थेट सरकारी व्हॉट्स अॅप हेल्पलाइन क्रमांकाशी जोडते.' 'जर तुम्ही सोशल डिस्टन्सिंग नियमांचं उल्लंघन केलंत तरी हा अॅप तुम्हाला सिग्नल देतो! तुम्हाला करोना व्हायरसशी संबंधित अपडेट रोज यावर मिळतील,' अशी माहिती प्रा. कुमारगुरू यांनी दिली.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2Sjblx2
via IFTTT

Post a Comment

0 Comments