Also visit www.atgnews.com
SEBI भरती; ऑनलाइन अर्जांना मुदतवाढ
नवी दिल्ली: सिक्युरिटीज अँड एक्स्चेंड बोर्ड ऑफ इंडिया () अर्थात सेबीमध्ये अनेक पदांवर भरती आहे. ही भरती प्रक्रीया सुरू असून ऑनलाइन अर्जांसाठी आता मुदतवाढ देण्यात आली आहे. इच्छुक उमेदवार ३१ मेपर्यंत अर्ज करू शकणार आहेत. यापूर्वीच्या नियोजित वेळापत्रकानुसार अखेरची मुदत ३० एप्रिल होती. सेबीमध्ये ऑफिसर ग्रेड ए (असिस्टंट मॅनेजर) पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवार सेबीच्या sebi.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. तब्बल १४७ पदे रिक्त आहेत. जाणून घेऊ किती पदे रिक्त - शाखा - पदे जनरल - ८० लीगल - ३४ आयटी - २२ सिव्हिल इंजिनीअरिंग - १ इलेक्ट्रीकल इंजिनीअरिंग - ४ रिसर्च - ५ ऑफिशिअल लँग्वेज - १ एकूण १४७ वयोमर्यादा - २९ फेब्रुवार २०२० रोजी उमेदवाराचे वय ३० वर्षांपेक्षा अधिक नसावे. म्हणजेच उमेदवार १ मार्च १९९० नंतर जन्मलेला असावा. निवड करायचे निकष निवड प्रक्रिया तीन टप्प्यात होईल. पहिल्या टप्प्यात प्रत्येकी १०० गुणांच्या दोन पेपरची ऑनलाइन चाचणी होईल. दुसऱ्या टप्प्यात प्रत्येकी १०० गुणांच्या दोन पेपरची ऑनलाइन चाचणी होईल. तिसऱ्या टप्प्यात मुलाखत घेतली जाईल. अर्जाचे शुल्क खुला प्रवर्ग, ओबीसी, इडब्ल्यूएस साठी प्रत्येकी १००० रुपये तर एससी, एसटी, PwBD वर्गासाठी १०० रुपये इंटिमेशन चार्जेस अधिकृत नोटिफिकेशन वाचण्यासाठी हेही वाचा:
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3at6L5J
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments