Also visit www.atgnews.com
राज्याच्या चार सीईटींच्या संभाव्य तारखा जाहीर
CET datesheet: राज्य प्रवेश परीक्षा कक्षाकडून (CET cell) ने आता MHT-CET पाठोपाठ उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अखत्यारित असलेल्या अभ्यासक्रमांच्या चार सीईटी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक बुधवारी जाहीर केले आहे. MCA, बी. एचएमसीटी, एम. आर्किटेक्चर, एम.एचएमसीटी परीक्षा आता १९ जुलै रोजी होणार आहेत. कोरोना विषाणूच्या संसर्गाची परिस्थिती लक्षात घेता सीईटी सेलने मार्च महिन्यात सर्व प्रकारच्या परीक्षांना स्थगिती दिलेली होती. एमबीए नंतर एमसीए अभ्यासक्रमाची सीईटी परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. आता एमसीए सीईटी बरोबर हॉटेल मॅनेजमेंट अँड कॅटरिंग टेक्नोलॉजी (बीएचएमसीटी) एम. आर्किटेक्चर, एम.एचएमसीटी या सीईटी परीक्षा १९ जुलै रोजी होणार आहे. एमसीए व्यतिरिक्त अन्य सीईटींसाठी विद्यार्थ्यांना ३१ मे पर्यंत अर्ज करता येणार आहेत, अशी माहिती आयुक्त संदीप कदम यांनी दिली आहे. सीईटी आलेले अर्ज - अर्जाची मुदत - संभाव्य परीक्षेची तारीख एमसीए - आलेले अर्ज -१८,५५५ - (अर्जांची मुदत संपली) - संभाव्य परीक्षा - १९ जुलै रोजी बी. एचएमसीटी - आलेले अर्ज -२,३४२ - (अर्जांची मुदत ३१ मे पर्यंत) - संभाव्य परीक्षा - १९ जुलै रोजी एम. आर्किटेक्चर -आलेले अर्ज - १,३०७ - (अर्जांची मुदत ३१ मे पर्यंत) - संभाव्य परीक्षा - १९ जुलै रोजी एम.एचएमसीटी - आलेले अर्ज - ३,५३१ - (अर्जांची मुदत ३१ मे पर्यंत) - संभाव्य परीक्षा - १९ जुलै रोजी
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2ZuHRk6
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments