शुल्क भरण्यासाठी विविध पर्याय द्या; यूजीसीच्या विद्यापीठांना सूचना

म. टा. प्रतिनिधी, पुणे शुल्क भरण्याच्या विद्यार्थी-पालकांच्या तक्रारींमुळे विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) विद्यार्थी आणि पालकांना शुल्क भरण्यासाठी विविध पर्याय द्यावेत, असे आदेश विद्यापीठे, महाविद्यालयांना दिले आहेत. करोनामुळे उद्भवलेली परिस्थिती लक्षात घेता, विद्यार्थ्यांचा सहानुभूतीने विचार करण्यात यावा, असेही यूजीसीने प्रसिद्ध केलेल्या पत्रात नमूद केले आहे. या निर्णयामुळे शुल्क भरण्याच्या विवंचनेत असणाऱ्या विद्यार्थी आणि पालकांना तात्पुरता दिलासा मिळण्याची शक्यता आहे. करोना विषाणूच्या प्रादुर्भामुळे देशातील महाविद्यालये, विद्यापीठे बंद आहेत. मात्र, काही विद्यार्थ्यांच शैक्षणिक वर्ष २०१९-२० चे शुल्क भरणे बाकी आहे. शुल्क भरण्यासाठी महाविद्यालये, विद्यापीठांकडून विद्यार्थ्यांकडे सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. महाविद्यालये, विद्यापीठांकडून सत्र शुल्क, वार्षिक शुल्क, परीक्षा शुल्क, शिक्षण शुल्क आदींचे शुल्क त्वरित भरण्याबाबत तगादा लावण्यात येत असल्याची तक्रार पालक-विद्यार्थ्यांकडून यूजीसीकडे करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर यूजीसीने देशभरातील विद्यापीठे, महाविद्यालयांना परिपत्रकाद्वारे आदेश दिले आहेत. लॉकडाउनमुळे विद्यार्थी आणि पालकांच्या आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे त्यांची शुल्क भरण्याची परिस्थिती नाही. विद्यार्थ्यांच्या अडचणी विचारात घ्याव्यात. या सर्वांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून परिस्थिती पूर्वपदावर येईपर्यंत विद्यार्थ्यांना शुल्क भरण्यासाठी पर्याय देण्यात यावेत, असे आदेश यूजीसीचे सचिव प्रा. रजनीश जैन यांनी पत्रकाद्वारे दिले आहे. या निर्णयाची विद्यापीठे आणि महाविद्यालयांनी तातडीने अंमलबजावणी करावी, मागणी पालकांनी केली आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3gE87Pj
via IFTTT

Post a Comment

0 Comments