लॉकडाऊन संपल्यानंतर शाळेची घंटा वाजेल, पण...

चीनमध्ये लॉकडाऊन संपल्यानंतर शाळा उघडल्या तेव्हा विद्यार्थी विशेषत: लहान बच्चेकंपनी विशिष्ट प्रकारच्या पेहरावात शाळेत जाऊ लागले...बातमीसोबतचं छायाचित्र पाहून तुम्हाला लक्षात आलं असेल की कल्पकतेने या विद्यार्थ्यांकडून सोशल डिस्टन्सिंग पाळून घेण्यात येत आहे. भारतातही लॉकडाऊन संपल्यानंतर शाळा सुरू झाल्यास तेथे पहिल्यासारखी परिस्थिती नसेल. अनेक प्रकारचे बदल दिसून येतील. काही विशिष्ट नियमावलीचं पालन करावंच लागणार आहे. केंद्र सरकारने यासाठी तयारी सुरू केली आहे. केंद्रीय मनुष्यबळ मंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांनी मागील वर्षी राज्यांच्या शिक्षणमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत या मुद्द्यावर चर्चा केली. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. त्यांनी सांगितलं की मंत्रालयाच्या शालेश शिक्षण विभागाने यासंदर्भातली मार्गदर्शत तत्वे तयार करण्याचं काम सुरू केलं आहे. प्रामुख्याने वर्गातली मुलांची बैठक व्यवस्था, सोशल डिस्टन्सिंग आणि स्वच्छतेच्या दृष्टीने मार्गदर्शक तत्वे तयार केली जात आहेत. ही मार्गदर्शक तत्वे अंतिम टप्प्यात आल्यानंतर देशभरातल्या शाळांमध्ये त्यानुसार निर्देश दिले जाणार आहेत. मंत्रालयाने सांगितले की जेव्हा शाळा महाविद्यालये सुरू होतील, विद्यार्थ्यांच्या सुरक्षा आणि आरोग्यासाठी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पूर्ण पालन केले जाण्यावर भर दिला जाईल. उच्च शिक्षण संस्थांसाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने यापूर्वीच दिशानिर्देश जारी केले आहेत.


    from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2StMRBu
    via IFTTT

    Post a Comment

    0 Comments