Also visit www.atgnews.com
डीडीवर १२ तासांचा एअर टाइम द्या: शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड
लॉकडाऊनमुळे घरी अडकून पडलेल्या विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणाचा प्रश्न सध्या प्रत्येक राज्य सरकारसमोर आ वासून उभा आहे. महाराष्ट्रात करोना संक्रमणाची स्थिती गंभीर असल्याने तसेच खबरदारीचा उपाय म्हणून देशात सुरू असलेल्या लॉकडाऊन स्थितीमुळे जून महिना उजाडायला आला तरी शाळा सुरू होण्याबाबत चित्र स्पष्ट नाही. शाळा सुरू करण्याचा धोका कोणत्याच सरकारला पत्करायचा नाही. ऑनलाइन शिक्षणाच्या पर्यायासमोर साधनांचा अभाव ही एक मोठी समस्या आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केंद्र सरकारकडे नॅशनल टेलिव्हिजनवरचा दिवसाचा १२ तासांचा एअर टाइम मागितला आहे. ऑल इंडिया रेडिओकडेही गायकवाड यांनी दोन तासांच्या स्लॉटची मागणी केली आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाला गायकवाड यांनी एक पत्र लिहिले आहे. हे वृत्त एका वृत्तपत्राने प्रसारित केले आहे. यानुसार, या पत्रात असे म्हटले आहे की, 'महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (SCERT) ने प्राथमिक आणि माध्यमिक वर्गांसाठी यापूर्वीच एक हजार हून अधिक तासांचे डिजीटल लर्निंग आणि इंटरॅक्टिव्ह कंटेंट एकत्र केले आहे. येत्या शैक्षणिक वर्षासाठी आम्हाला १२ तासांचे दैनंदिन शिक्षण साहित्य डीडीच्या दोन वाहिन्यांच्या माध्यमातून प्रसारित करायचे आहे. दोन तासांचे प्रसारण ऑल इंडिया रेडिओवरूनही व्हावे अशी आमची मागणी आहे.' दूर्गम भागात राहणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचायचे असेल तर या वाहिन्यांचा खूप मोठा फायदा होणार आहे. विद्यार्थ्यांकडे इंटरनेट, स्मार्टफोन या सुविधा नसल्याने या वाहिन्यांचा उपयोग करता येऊ शकेल, असे गायकवाड यांचे म्हणणे आहे. खेड्यातल्या, दुर्गम भागातल्या घरातही एक टेलिव्हिजन संच असतो. शिक्षण प्रक्रियेत सातत्या राखण्यासाठी हा चांगला उपाय असल्याचं शिक्षणमंत्र्यांनी केंद्राला सांगत या एअर स्लॉटची मागणी केली आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3evxgKd
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments