'या' दिवशी होणार नीट, जेईई परीक्षांच्या तारखांची घोषणा

राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा (NEET) आणि जॉइंट प्रवेश परीक्षा (JEE Main) यांच्या तारखांच्या घोषणेसंदर्भात महत्त्वाची माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने जारी केली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आणि या दोन्ही परीक्षा कधी होणार याची घोषणा केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक करणार आहेत. येत्या मंगळवारी ५ मे रोजी जेईई मेन आणि नीट या परीक्षांच्या तारखांची घोषणा होणार आहे. ५ मे रोजी डॉ. पोखरियाल यांनी विद्यार्थ्यांसोबत एका वेबिनारचे आयोजन केले आहे. ते टि्वटरवर लाइव्ह असणार आहेत. देशभरातले विद्यार्थी त्यांना प्रश्न विचारणार आहेत. दरवर्षी लाखो विद्यार्थी मेडिकल आणि इंजिनिअरिंगच्या यूजी कोर्सेसच्या प्रवेशांसाठी नीट आणि जेईई या पात्रता परीक्षा देतात. यावर्षीही बारावीची परीक्षा दिलेल्या लाखो विद्यार्थांना या दोन परीक्षांची प्रतीक्षा आहे. यावर्षी करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नॅशनल टेस्ट एजन्सीने नीट यूजी २०२० (NEET UG 2020) आणि जेईई मेन २ (JEE Main 2) या परीक्षा लांबणीवर टाकल्या. सर्व विद्यार्थ्यांना दरम्यानच्या काळात त्यांचे परीक्षा केंद्र असलेल्या शहराचा पर्याय बदलण्याची संधी देण्यात आली. जेईई मेनच्या आधारे देशातल्या विविध इंजिनीअरिंग महाविद्यालयांमध्ये इंजिनीअरिंगच्या यूजी कोर्समध्ये प्रवेश दिला जातो. नीट परीक्षा यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना विविध मेडिकल महाविद्यालयांमध्ये एमबीबीएस आणि बीडीएस कोर्सेसमध्ये प्रवेश मिळतो.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/35zxcpt
via IFTTT

Post a Comment

0 Comments