Also visit www.atgnews.com
परीक्षांसंदर्भात मुंबई विद्यापीठाची मार्गदर्शक तत्वे लवकरच
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई विद्यापीठ अनुदान आयोगाने जाहीर केलेली मार्गदर्शक तत्त्वे आणि राज्य सरकारने गठीत केलेल्या समितीच्या अहवालानुसार परीक्षा आणि शैक्षणिक वर्षांचे नियोजन करण्यासाठी व अहवालातील तरतुदी विशद करण्यासाठी मुंबई विद्यापीठाने संलग्नित कॉलेजांतील प्राचार्य, संचालक आणि विद्यापीठ शैक्षणिक विभागप्रमुखांशी संवाद साधला. यावेळी विद्यापीठाची स्वतंत्र मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करण्यात येतील, असे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांनी सांगितले. कॉलेजांनी घ्यावयाच्या परीक्षा, गुणांचे नियोजन, अंतर्गत मूल्यांकन, ग्रेडींग पॅटर्न, एटीकेटी अशा अनुषंगिक बाबींवर सखोल चर्चा करण्यात आली. पहिल्या टप्प्यात कला, विज्ञान, वाणिज्य कॉलेजांचे प्राचार्य, व्यवस्थापन संस्थांचे संचालक अशा ४७६ तर दुसऱ्या टप्प्यात अभियांत्रिकी, फार्मसी, विधि, शिक्षणशास्त्र कॉलेजचे प्राचार्य-संचालक अशा ३२६ आणि शेवटच्या टप्प्यात विद्यापीठ विभागातील ५५ विभागप्रमुख आणि संचालक अशा एकूण ८५७ प्राचार्य, संचालक आणि विभागप्रमुखांशी आभासी पद्धतीने संवाद साधण्यात आला. विविध तीन टप्प्यांत आयोजित करण्यात आलेल्या या सत्रांना मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर यांनी अहवालातील तरतुदीनुसार करायवयाची कामे स्पष्ट करून कॉलेजांच्या शंकांचे निरसन केले. विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठ स्तरावर हेल्पलाइन आणि ई-मेलची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून जिल्हापातळीवर विद्यार्थ्यांसाठी समुपदेशनाची सोय उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच परीक्षा आणि शैक्षणिक वर्षांच्या नियोजनासाठी विद्यापीठ कृती आराखडा तयार करत असून कॉलेजे आणि विद्यापीठ विभागांसाठी लवकरच मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली जाणार असल्याचेही डॉ. पेडणेकर यांनी सांगितले.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2TbvB49
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments