प्रत्येक इयत्तेसाठी एक वाहिनी; लवकरच शिक्षणासाठी १२ नव्या वाहिन्या

नवी दिल्ली: शालेय मुलांच्या दृकश्राव्य शिक्षणासाठी १२ वाहिन्या सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी रविवारी मुलांच्या शिक्षणासाठी 'वन क्लास वन चॅनल' योजनेंतर्गत १२ नवीन वाहिन्या सुरू करण्याची घोषणा केली. आत्मनिर्भर भारत कार्यक्रमांतर्गत शिक्षणासाठी केंद्र सरकार काय उपाययोजना करणार आहे, याची माहिती सीताारामन यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली. त्या म्हणाल्या की, स्वयंप्रभा आणि डीटीएचच्या माध्यमातून यापूर्वीच मुलांना शिक्षण दिले जात आहे आणि आता १२ नवीन वाहिन्या त्या अंतर्गत आणल्या जातील. खेड्यातील मुलंही या वाहिन्यांवरील अभ्यासाचा लाभ घेऊ शकणार आहेत. सीतारामन म्हणाल्या की, पंतप्रधान ई-विद्या कार्यक्रम लवकरच सुरू केला जाईल. शिक्षणासाठी नवीन व्यासपीठ सुरू करण्याची घोषणा करताना अर्थमंत्री म्हणाल्या की प्रत्येक इयत्तेसाठी एक टीव्ही चॅनेल असेल आणि रेडिओ व कम्युनिटी रेडिओचा उपयोग केला जाईल. अर्थमंत्र्यांनी देशातील १०० टॉप विद्यापीठांना ऑनलाईन अभ्यासक्रम सुरू करण्यास मान्यता दिल्याचीही घोषणा केली. करोना साथीच्या आजाराला ढासळलेल्या भारताच्या अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत कार्यक्रमांतर्गत २० लाख कोटींचं पॅकेज जाहीर केलं आहे. या पॅकेजच्या पाचव्या आणि अखेरच्या टप्प्यातील उपाययोजनांबद्दल सीतारामन रविवारी बोलत होत्या. देशापुढील आर्थिक आव्हानांना तोंड देण्यासाठी पंतप्रधानांनी २० लाख कोटी रुपयांचे मदत पॅकेज जाहीर केले आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3cIR5gx
via IFTTT

Post a Comment

0 Comments