CBSE पेपरतपासणीसाठी ३,००० शाळा परीक्षा केंद्रे

देशभरात तब्बल ३ हजार शाळांना सीबीएसई बोर्डाची परीक्षा केंद्रे म्हणून निश्चित करण्यात आले आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री डॉ. रमेश पोखरियाल यांनी ही शनिवारी ९ मे रोजी ही माहिती दिली. सीबीएसई दहावी, बारावीच्या परीक्षांच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन आता शिक्षक आपापल्या घरी करणार आहेत. पोखरियाल यांनी सांगितल की सीबीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या ज्या परीक्षा आधी होऊन गेल्या आहेत, त्यांच्या दीड कोटी उत्तरपत्रिका शिक्षकांपर्यंत पोहोचवल्या जाणार आहेत. त्यासाठी देशभरात तीन हजार शाळा परीक्षा केंद्र बनवण्यात येणार आहेत. सीबीएसई बोर्डानेदेखील यासंदर्भातले परिपत्रक जारी केले आहे. त्यानुसार, अन्य सर्व शाळा बंद राहतील. मात्र सीबीएसई बोर्डाशी संलग्न या तीन हजार शाळा मर्यादित स्वरुपात कार्यरत राहून परीक्षा केंद्र म्हणून काम पाहतील. या ठिकाणांहून शिक्षकांच्या घरी उत्तरपत्रिका पाठवण्यात येतील. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या माध्यमातून ही यंत्रणा राबवण्यात येत आहे. डॉ. पोखरियाल यांनी यासाठी परवानगी देणाऱ्या गृहमंत्री अमित शहा यांचे आभार मानले आहेत. दरम्यान, सीबीएसईच्या उर्वरित २९ विषयांच्या परीक्षा १ ते १५ जुलै दरम्यान होणार आहेत.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2WApiba
via IFTTT

Post a Comment

0 Comments