Also visit www.atgnews.com
DRDO मध्ये मोठी नोकरभरती; करा अर्ज
DRDO Recruitment 2020: तुम्ही अभियांत्रिकीचा अभ्यास केला असेल तर संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अर्थात डीआरडीओ मध्ये तुम्हाला सरकारी नोकरी मिळण्याची चांगली संधी आहे. डीआरडीओने सायंटिस्टची पदांवर भरती सुरू केली आहे. काही पदे केवळ लेखी परीक्षा व मुलाखतीच्या आधारे तर काही केवळ मुलाखतीच्या आधारे भरली जाणार आहेत. या पदांवर भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया आणि रिक्त जागांची संपूर्ण माहिती आम्ही येथे देत आहोत. तसेच या भरतीसाठी डीआरडीओने दिलेला अधिसूचना आणि अर्जाच्या लिंक्सही देण्यात येत आहेत. पदांची माहिती वैज्ञानिक 'बी' - एकूण पदांची संख्या - १६७ विभागनिहाय पदांची संख्या इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनीअरिंग - ३७ मेकॅनिकल इंजिनीअरिंग - ३५ कॉमुप्यूटर सायन्स इंजिनीअरिंग - ३१ इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग - १२ मटेरियल सायन्स/मेटलर्जिकल इंजिनीअरिंग - १० फिजिक्स - ०८ केमिस्ट्री - ०७ केमिकल इंजिनीअरिंग - ०६ एरोनॉटिकल इंजिनीअरिंग - ०४ मॅथेमॅटिक्स - ०४ सिविल इंजिनीअरिंग - ०३ या व्यतिरिक्त मानसशास्त्राचा अभ्यास आणि नेट क्वालिफाय करणाऱ्या उमेदवारांसाठी १० पदे भरली जाणार आहेत. अर्जाची माहिती ऑनलाइन अर्ज भरायचे आहेत. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज १३ मे २०२० पासून सुरू झाले आहेत. ऑनलाईन अर्ज जमा भरण्याची शेवटची तारीख १० जुलै २०२० आहे. जनरल, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गाच्या उमेदवारांना १०० रुपये शुल्क भरावे लागतील. अन्य सर्वांसाठी अर्जप्रक्रिया विनामूल्य आहे. आपण क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा नेट बँकिंगद्वारे अर्ज शुल्क भरू शकता. आवश्यक पात्रता संबंधित अभियांत्रिकी शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे. काही पदांसाठी गेट स्कोअरही (GATE) मागितला गेला आहे. वयोमर्यादा पदांनुसार वेगवेगळी आहे. अधिसूचनेमध्ये सविस्तर माहिती वाचू शकता. डीआरडीओ वैज्ञानिक भरती २०२० च्या अधिसूचनेसाठी B vacancy 2020 अर्ज करण्यासाठी डीआरडीओ वेबसाइटवर जाण्यासाठी
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/362olNt
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments