Also visit www.atgnews.com
हैदराबाद विद्यापीठाचे नाव बदलण्याचा प्रस्ताव
हैदराबाद विद्यापीठाचे () नाव लवकरच बदलले जाण्याची शक्यता आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. आर. चंद्रशेखर राव (Telangana CM KCR) यांनी या नामांतराचा प्रस्ताव सादर केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही राव यांनी या नामांतराच्या प्रस्तावासंबंधी शिफारस करणारे पत्र पाठवले आहे. केसीआर यांनी पंतप्रधान मोदींना पाठवलेल्या पत्रात लिहिले आहे की हैदराबाद विद्यापीठाला माजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंह राव यांचे नाव देण्यात यावे अशी तेलंगणाच्या जनतेची इच्छा आहे. विद्यापीठाचे नाव बदलून 'पी.व्ही. नरसिंहराव सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ हैदराबाद' असे करण्यात यावे असे आवाहन केसीआर यांनी केले आहे. माजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंह राव यांच्या जन्मशताब्दीनिमित्त संपूर्ण वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. मुख्यमंत्री केसीआर यांनी पंतप्रधान मोदींना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, 'पी. व्ही. नरसिंह राव यांचा जन्म २८ जून १९२१ रोजी तेलंगणमध्ये (तत्कालीन आंध्र प्रदेश) झाला. त्यांनी देशाच्या विकासात मोलाचे योगदान दिले आहे. विशेषत: १९९१ च्या आर्थिक मंदीच्या काळात देशात आर्थिक सुधारणा करण्याचे काम त्यांनी केले. हेही वाचा: एवढेच नव्हे तर देशाच्या शैक्षणिक धोरणालाछी त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. राज्य पातळीवर निवासी शाळा आणि राष्ट्रीय पातळीवर नवोदय शाळा स्थापना करणे हे शिक्षण व्यवस्था बळकट करण्याच्या दृष्टीने अतिशय ठोस पाऊल असल्याचे सिद्ध झाले आहे. या शाळा आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातून आलेल्या देशातील गुणवंत मुलांना दर्जेदार शिक्षण देत आहेत. हेही वाचा:
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/31seJv8
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments