कोट्यवधी विद्यार्थ्यांना लॅपटॉप, टॅब, टीव्ही? केंद्राचा प्रस्ताव

Digital Education amid corona pandemic: करोना विषाणूच्या संक्रमण काळात पहिल्यांदाच सर्व स्तरांवरील शिक्षण ऑनलाइन होत आहे. परंतु या काळाने याचेही भान आणले आहे की डिजिटल शिक्षण पूर्णत: अंमलात आणण्यासाठी अजून काही टप्पे पार करणे आवश्यक आहे. या दिशेने पावले टाकत केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने (HRD Ministry) केंद्र सरकारसमोर एक प्रस्ताव ठेवला आहे. या प्रस्तावामध्ये उच्च शिक्षण विभागाने देशातील विविध महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना लॅपटॉप, टॅबलेट, टीव्ही, मोबाइल फोन ही डिजीटल उपकरणे उपलब्ध करुन देण्याची योजना आखली आहे. त्यासाठी येत्या पाच वर्षांत ६० हजार कोटी खर्च करण्याचे प्रस्तावित केले आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने सोमवारी हा प्रस्ताव १५ व्या वित्त आयोगासमोर सादर केला आहे. टप्प्याटप्प्याने दिली जाणार साधने प्रस्तावात नमूद केलेल्या योजनेनुसार मंत्रालयाने म्हटले आहे की २०२५-२६ पर्यंत देशभरातील उच्च शिक्षण घेत असलेल्या सुमारे ४० टक्के विद्यार्थ्यांना ही डिजिटल उपकरणे मिळतील. देशातील विविध महाविद्यालये व विद्यापीठांमध्ये सुमारे ३.७५ कोटी विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी नोंदले गेले आहेत. या प्रस्तावात असे म्हटले आहे की पहिल्या वर्षात म्हणजेच २०२१-२२ मध्ये १.५ कोटी, २०२२-२३ मध्ये ५५ लाख, २०२३-२४ मध्ये ६१ लाख, २०२४-२५ मध्ये ६७ लाख आणि २०२५-२६ मध्ये ७३ लाख विद्यार्थ्यांना डिजिटल उपकरणे उपलब्ध करुन दिली जातील. राज्य सरकारांनादेखील द्यावं लागेल योगदान पाच वर्षात ६० हजार कोटींपैकी, ३६,४७३ कोटी रुपये केंद्र सरकारद्वारे उपलब्ध करून दिले जातील. उर्वरित खर्च संबंधित राज्य सरकारांना सोसावा लागेल. या प्रस्तावात मंत्रालयाने प्रत्येक डिव्हाइसवरील सरासरी खर्च १५,००० रुपये ठेवला आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2Be6mZu
via IFTTT

Post a Comment

0 Comments