यूपी शिक्षक भरती घोटाळा: चौकशीसाठी समिती

UP teacher bharti fraud: उत्तर प्रदेशात सध्या बनावट शिक्षक भरतीचा मुद्दा ऐरणीवर आहे. एकाच वेळी राज्यातील अनेक शाळांमध्ये अनामिका शुक्ला नावाच्या शिक्षिकेच्या नावे बनावट प्रमाणपत्रांवर विविध शाळांमध्ये शिकवण्याचे आणि सर्वत्र वेगळा पगार घेण्याचे प्रकरण समोर आले. विशेष म्हणजे राज्यात ६९ हजार शिक्षक भरती प्रकरणी वाद रंगलेला असतानाच हे प्रकरण समोर आले. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश सरकारने एक नवीन समिती गठीत केली आहे. उत्तर प्रदेश पायाभूत शिक्षण विभागांतर्गत ही समिती स्थापन करण्यात आली आहे. राज्यात बनावट प्रमाणपत्रांवर केलेल्या बनावट शिक्षक भरतींची चौकशी करण्यास सरकारने या समितीला सांगितले आहे. सोमवारी अनामिका शुक्ला प्रकरणाशी संबंधित तीन जणांना उत्तर प्रदेश स्पेशल टास्क फोर्सने अटक केली आहे. १० जून रोजी अनामिका शुक्ला यांना उत्तर प्रदेशातील गोंडाच्या बेसिक एज्युकेशन ऑफिसरसमोर सादर करण्यात आले. कस्तुरबा गांधी कन्या शाळांमध्ये नोकरीसाठी तिच्या शैक्षणिक प्रमाणपत्रांचा गैरवापर केल्याचा आरोप तिने केला आहे. हेही वाचा: कोणीतरी अनामिका शुक्ला यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला, तेव्हा हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आलं. अनामिका या २५ विविध शाळांकडून दरवर्षी एक कोटी रुपयांचा पगार उकळत आहेत, अशी तक्रार होती. अनामिका यांना या एफआयआरनंतरच कळलं की त्यांचे नाव आणि प्रमाणपत्र वापरून कोणीतरी हा सर्व गैरप्रकार केला आहे. हेही वाचा: अद्याप या प्रकरणाचा तपास सुरू आहे. दरम्यान, आता सरकारने तयार केलेली नवीन समिती राज्यातील अन्य शोधून चौकशी करेल.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/37FuU9d
via IFTTT

Post a Comment

0 Comments