शाळा प्रवेश पद्धतीत लॉकडाऊनमुळे झाला बदल

Maharashtra : नवीन शैक्षणिक वर्षांत शाळा प्रवेशांची पद्धतही कोविड - १९ मुंळे बदलली आहे. व्हिडिओ कन्सल्टेशन्स, व्हर्च्युअल स्कूल टूर्स आणि ऑनलाइन मुलाखती (ओरिएन्टेशन सेशन्स) हा नवा पायंडा पडला आहे. अनेक शाळांनी या नव्या पद्धतींनी प्रवेश करायला सुरुवात केली आहे. मात्र काही शाळांनी यंदा नवे प्रवेशच न करण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक शाळांचे प्रवेश फेब्रुवारीत पूर्ण झाले होते, पण माध्यमिकचे नवे प्रवेश सुरू आहेत. पालक शाळा प्रवेशाआधी किमान दोन-तीन वेळा तरी शाळांना प्रत्यक्ष भेट देतात, मगच निर्णय घेतात. अशा पालकांसाठी शाळा व्हर्च्युअल स्कूल टूर घडवून आणत आहेत. काही शाळांनी लॉकडाऊनपूर्वी प्रवेशांसाठी पालकांकडून अर्ज घेतले होते, पण लॉकडाऊनमुळे हे प्रवेश निश्चित झाले नाहीत. पोदार जम्बो किड्स शाळा देशभरातील केंद्रांवर पालकांना स्काइपद्वारे कनेक्ट करत आहेत. त्यांना शाळेची व्हर्च्युअल टूर घडवून आणत आहेत. दुसरीकडे, कनिष्ठ मध्यमवर्ग असलेल्या शाळांची स्थिती वेगळी आहे. 'आमच्या शाळेत येणाऱ्या मुलांचे पालक टेक सॅव्ही नाहीत. आम्ही येत्या शैक्षणिक वर्षासाठी नवे प्रवेश केले नाहीत. अनेक पालक श्रमिक वर्गातले आहेत. त्यापैकी बहुतेकांनी लॉकडाऊनमध्ये शहर सोडले आहे. त्यामुळे शाळा प्रत्यक्ष सुरू होईपर्यंत वाट पाहण्याशिवाय आमच्याकडे पर्याय नाही,' असे कांदिवलीच्या हिल्डा कॉन्व्हेंट हायस्कूलचे मुख्याध्यापक प्रशांत रेडिज यांनी सांगितले.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2BQN63V
via IFTTT

Post a Comment

0 Comments