३३ हजारांवर विद्यार्थ्यांनी दिली एम्स पीजी परीक्षा

नवी दिल्ली: ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स () ने शुक्रवारी पदव्युत्तर पदवी प्रवेश परीक्षांचे आयोजन केले होते. एकूण ३३ हजारांवर विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. कोविड - १९ च्या पार्श्वभूमीवर सर्व आवश्यक ती खबरदारी घेण्यात आल्याचे एम्स प्रशासनाने सांगितले. एकूण ३३,४९१ विद्यार्थ्यांनी प्रवेश परीक्षा दिली. एम.डी., एम.एस., एमडीएस, डीएम, सीएच, फेलोशीप, बीएससी-पोस्टबेसिक, एमएससी नर्सिंग कोर्सेस या अभ्यासक्रमांसाठी ही प्रवेश परीक्षा होते. देशातील सर्व राज्यात आणि चार केंद्रशासित प्रदेशांमध्ये ही परीक्षा झाली. सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम पाळण्यात आले. अॅडमिट कार्डवर टच फ्री एन्ट्रीसाठी बारकोड होता. ही परीक्षा संगणक आधारित होती. परीक्षेत एमडी/एमएससाठी २०० वस्तुनिष्ठ प्रकारचे प्रश्न होते आणि एमडीएससाठी ९० वस्तुनिष्ठ प्रकारचे प्रश्न होते. सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळण्यासाठी परीक्षा केंद्रांच्या शहरांमध्येही वाढ करण्यात आली होती. ६० ऐवजी १५७ शहरे होती. प्रत्येक राज्यात किमान एक केंद्र येईल याची काळजी घेण्यात आली. परीक्षेच्या वेळेतही बदल करण्यात आला होता. सकाळी ९ ऐवजी दुपारी १ वाजता परीक्षा सुरू झाली, जेणेकरून विद्यार्थ्यांना सकाळी प्रवासाचा वेळ मिळेल.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3htl2Em
via IFTTT

Post a Comment

0 Comments