नीट परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी; आरोग्य मंत्रालयाला पत्र

देशातील करोनाव्हायरसच्या चिंताजनक परिस्थितीमुळे सीबीएसई आणि आयसीएसई परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. CTET 2020 ची परीक्षाही पुढे ढकलण्यात आली आहे. आता आणि जेईई मेनची परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी होत आहे. पॅरेंट असोसिएशन ऑफ इंडियाने यासंदर्भात आरोग्य मंत्रालयाला एक पत्र लिहिले आहे. पुढे ढकलण्यासाठी असोसिएशनने १६ मुद्द्यांची यादी केली आहे. २६ जुलै रोजी ही परीक्षा होणार असून यामध्ये सुमारे १६ लाख विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. पेरेंट्स असोसिएशन ऑफ इंडियाने लिहिलेल्या पत्रात असे म्हटले आहे की करोनाव्हायरसचे स्वरूप पाहता याचा परिणाम केवळ विद्यार्थ्यांच्या जीवनावरच होणार नाही तर संपूर्ण देशाच्या आरोग्यावर आणि सुरक्षिततेवरही परिणाम होईल. देशातील इतर पालक संघटनांनीही या परीक्षेला विरोध दर्शविला आहे. नीट २०२० परीक्षा यापूर्वीही स्थगित नीट २०२० परीक्षा याआधीर ३ मे २०२० रोजी ठेवण्यात आली होती. करोनाव्हायरस संसर्ग रोखण्यासाठी घेतलेल्या लॉकडाऊनमुळे इतर परीक्षांसह नीटची ही परीक्षाही पुढे ढकलण्यात आली. मे च्या अखेरीस परीक्षेच्या तारखा जाहीर करण्यात आल्या. परंतु करोनाव्हायरस संसर्गाच्या स्थितीत सुधारणा होत नसल्याने ही परीक्षा पुन्हा पुढे ढकलण्याची मागणी होत आहे. सीबीएसई आणि आयसीएसई परीक्षा रद्द ईशान्य दिल्लीतील दंगलीचा त्या भागातील दहावी आणि बारावीच्या परीक्षांवर परिणाम झाला होता. बारावीच्या उर्वरित परीक्षा लॉकडाऊन देशभरात स्थगित करण्यात आल्या. दहावीची परीक्षा ईशान्य दिल्लीत होणार होती तरcबारावीच्या उर्वरित परीक्षा देशभर घेण्यात येणार होत्या. सीबीएसई १० वी आणि १२ वीच्या या उर्वरित विषयांच्या परीक्षा १ ते १५ जुलै २०२० या कालावधीत घेण्यात येणार होत्या, पण या परीक्षादेखील रद्द करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांचा निकाल एका विशिष्ट फॉर्म्युलाच्या आधारे तयार केला जाईल. आयसीएसई बोर्डानेही परीक्षा रद्द केली आहे. ५ जुलै रोजी केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा CTET 2020 परीक्षा होणार होती. सीबीएसईने ही परीक्षा स्थगित केल्याची नोटीसही बजावली आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/38gIIas
via IFTTT

Post a Comment

0 Comments