यूपीएससी पूर्व परीक्षा: आज जाहीर होणार परीक्षेची तारीख

Civil Service Prelims 2020 exam date: केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी नागरी सेवा पूर्व परीक्षा आयोजित व्हायची आहे. पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार ही परीक्षा ३१ मे २०२० रोजी होणार होती. पण लॉकडाऊनमुळे ती स्थगित करण्यात आली होती. या परीक्षेच्या नव्या तारखेची घोषणा ५ जून २०२० रोजी होणार आहे. आयोगाने २० मे २०२० रोजी नागरी सेवा पूर्व परीक्षेची तारीख घोषित करणार होता. पण परिस्थिती सामान्य झाल्यानंतर परीक्षेच्या तारखेची घोषणा करण्यात येणार असल्याचे आयोगाने जाहीर केले. परिस्थितीचा आढावा घेऊन ५ जून २०२० रोजी तारखेबाबतची माहिती जाहीर केली जाणार असे आयोगाने कळवले. करोनासंदर्भातल्या स्थितीचा आढावा घेतल्यानंतर ५ जून रोजी आयोगाच्या संकेतस्थळावर या तारखेची घोषणा करण्यात येईल, असे आयोगाने कळवले होते. केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) दरवर्षी नागरी सेवा परीक्षा (यूपीएससी सीएसई - सिव्हिल सर्व्हिस परीक्षा) घेते. ही देशातील सर्वात प्रतिष्ठित परीक्षा आहे. देशातील लाखो तरुण सेवेचे स्वप्न पाहतात. दरवर्षी लाखो उमेदवार या परीक्षेस बसतात.या परीक्षेच्या माध्यमातून निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती भारत सरकारच्या प्रशासकीय व इतर सेवांमध्ये केली जाते.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3cBlE78
via IFTTT

Post a Comment

0 Comments