Also visit www.atgnews.com
इग्नूची ऑनलाइन प्रोजेक्ट सबमिशन लिंक खुली
इंदिरा गांदी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ अर्थात ने विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रकल्प सादर करण्यासाठी लिंक खुली केली आहे. इग्नूच्या अधिकृत संकेतस्थळावर ही लिंक उपलब्ध आहे. जून सत्रअखेर परीक्षेसाठी इग्नूने असाइनमेंट आणि प्रोजेक्ट सबमिशनच्या ऑनलाइन पद्धती सुरू केल्या आहेत. दरम्यान, परीक्षेशी संबंधित मटेरिअल सबमिट करण्याची अखेरची मुदतही १५ जूनपर्यंत वाढवली आहे. लॉकडाऊनमुळे इग्नूने विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने प्रकल्प व असाइनमेंट सादर करण्यास सांगितले आहे व त्याची पद्धतही दिली आहे. ते १५ जूनपर्यंत जमा करता येणार आहेत. जे विद्यार्थी प्रकल्प आणि असाइनमेंट सबमिट करणार नाहीत त्यांना थिअरी पेपर देण्याची परवानगी मिळणार नाही, असेही इग्नूने स्पष्ट केले आहे. दरम्यान, इग्नूच्या जून टीईई २०२० चा परीक्षा अर्ज भरण्याची मुदत पुन्हा एकदा वाढवण्यात आली आहे. पहिल्या जून टीईई 2020 साठी परीक्षा अर्ज जमा करण्याची शेवटची तारीख ३१ मे २०२० होती. आता उमेदवार १५ जून २०२० पर्यंत या परीक्षेसाठी अर्ज भरू शकतात.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2Y0wCO8
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments