Also visit www.atgnews.com
दिल्ली विद्यापीठाची ओपन बुक टेस्ट लांबणीवर
DU : दिल्ली विद्यापीठाने अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाच्या ओपन बुक परीक्षा () पुढे ढकलल्या आहेत. या परीक्षा १ जुलैपासून सुरू होणार होत्या. पण त्या आता आणखी दहा दिवस पुढे ढकलण्यात आल्या आहेत. कोविड - १९ विषाणूची लागण होणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत असल्याने विद्यापीठाने हा निर्णय घेतला. सर्व पदवीपूर्व आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी नवे वेळापत्रक ३ जुलै रोजी जाहीर करणार असल्याचे विद्यापीठाने कळवले आहे. या ओपन बुक टेस्टला शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा सातत्याने विरोध होत आहे. आपल्या मूळ घरी परतलेल्या विद्यार्थ्यांकडे शैक्षणिक साहित्य नाही, पुस्तके, नोट्स नाहीत, तसेच अनेक ठिकाणी इंटरनेट कनेक्टिव्हिटीची समस्या आहे, असे असताना या परीक्षा घेणे अयोग्य असल्याचे शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. 'सर्व यूजी, पीजी, SOL, NCWEB शाखांच्या अंतिम सत्र परीक्षा, ज्या ओपन बुकच्या माध्यमातून होणार होत्या, त्या १० दिवस पुढे ढकलण्यात आल्या आहेत. कोविड-१९ महामारीच्या स्थितीत सुधारणा न झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे,' असं दिल्ली विद्यापीठाच्या नोटिफिकेशनमध्ये म्हटले आहे. सध्याच्या स्थितीत सर्व संबंधित विशेषत: विद्यार्थ्यांना या परीक्षा अटेंड करण्यात समस्या येऊ शकतात, त्यामुळे तूर्त तरी १० दिवसांसाठी त्या पुढे ढकलण्यात आल्याचे या नोटिफिकेशनमध्ये म्हटले आहे. या परीक्षांचे नवे वेळापत्रक ३ जुलै रोजी जाहीर करण्यात येईल आणि १० जुलैपासून या परीक्षांना सुरुवात होईल, असं या नोटिफिकेशनमध्ये नमूद करण्यात आलं आहे. दिल्लीत सध्या करोना संक्रमणाची स्थिती अतिशय गंभीर आहे. शुक्रवारी २६ जूनपर्यंत दिल्लीतील कोविड -१९ संक्रमित लोकांची संख्या ७७,२४० वर पोहोचली आहे. २,४९२ जणांचा मृत्यू झाला आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3i5mjBD
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments