Also visit www.atgnews.com
'हे' राज्य अभ्यासक्रमात आणणार करोनाचा धडा
कोविड - १९ विषाणूच्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर प. बंगाल राज्याचा शालेय शिक्षण विभाग 'करोना' वरील धडा शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याच्या प्रस्तावावर विचार करत आहे. या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यास २०२१-२२ या शैक्षणिक वर्षापासून हा धडा पाठ्यक्रमात समाविष्ट होईल. शालेय शिक्षण विभागातील अभ्यासक्रम समितीतील एका अधिकाऱ्याने मंगळवारी ही माहिती दिली. राज्याचे शालेय शिक्षण मंत्री पार्थ चॅटर्जी यांनी अलीकडेच नोवेल करोना व्हायरस आणि आवश्यक ती खबरदारी यासंबंधीच्या माहितीचा मुद्दा उपस्थित केला होता, अशी माहितीही या अधिकाऱ्यांनी दिली. 'करोनासंदर्भातील धडा पाठ्यक्रमात समाविष्ट करण्याच्या दृष्टीने आम्ही सिलॅबस समितीचे सदस्य आणि तज्ज्ञांशी चर्चा करत आहोत,' अशी माहिती अभ्यासक्रम समितीचे अध्यक्ष अवीक मजुमदार यांनी दिली. प्राथमिकपासून माध्यमिकच्या वर्गांपर्यंत करोना व्हायरससंबंधातील पाठ अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याबाबत विचार सुरू असल्याची माहिती अन्य एका अधिकाऱ्यांनी दिली. बेसिक हायजिनची माहिती, सुरक्षिततेच्या दृष्टीने घ्यायची खबरदारी अशी माहिती प्राथमिकच्या वर्गांना तर साथीच्या आजारांचे प्रकार, स्वरुपाचा कोविड - १९ च्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या आढाव्याचा अभ्यास उच्च माध्यमिक वर्गांना असणार आहे, अशी माहिती या अधिकाऱ्यांनी दिली. 'पाठाचं कंटेंट काय असेल याविषयी शिक्षक आणि शिक्षणतज्ज्ञांव्यतिरिक्त आम्ही डॉक्टर्स, व्हायरॉलॉजिस्ट्स, एपिडेमिऑलॉजिस्ट्स आदींची मतेही घेणार आहोत,' असं मजुमदार म्हणाले.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/31xaDlg
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments