सीबीएसईच्या परीक्षा रद्द करा; मनीष सिसोदियांची मागणी

दिल्लीचे उपमुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री मनीष सिसोदिया यांनी केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल यांना पत्र लिहिले आहे. हे पत्र कोविड - १९ महामारीच्या पार्श्वभूमीवर सीबीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या उर्वरित परीक्षांसंदर्भात आहे. पत्रात लिहिलंय की १ ते १५ जुलै दरम्यान परीक्षांसाठी शाळा वापरणं आणि सर्व विद्यार्थी तेथे परीक्षा देतील हे सुनिश्चित करणं कठीण आहे. त्यामुळे या परीक्षा रद्द करण्यात याव्यात. परीक्षा रद्द करून या विषयांचे निकाल अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे जाहीर करावेत, अशी मागणी सिसोदिया यांनी केली आहे. सर्वोच्च न्यायालयाचेही निर्देश सर्वोच्च न्यायालयाने देखील या परीक्षा रद्द करण्यावर विचार करण्याचे निर्देश दिले आहेत. सीबीएसई बोर्डाला यासंदर्भात मंगळवारपर्यंत कोर्टापुढे आपलं म्हणणं मांडायचं आहे. परीक्षा रद्द केल्या जाऊ शकतात का आणि विद्यार्थ्यांना आधीच्या अंतर्गत मूल्यांकनाच्या आधारे प्रमोट करता येऊ शकता येतं का यावर बोर्डाने विचार करावा असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे. कुठल्या विषयांच्या परीक्षा? देशभरात लॉकडाउनच्या काळात राहिलेल्या सर्व पेपरच्या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. यात दहावीचे चार पेपर शिल्लक राहिले हेाते, त्यात समाजशास्त्र, विज्ञान, हिंदी, इंग्रजी संभाषण या पेपरांचा समावेश आहे. तर, बारावीचे तब्बल विविध विभागांतील २३ पेपर शिल्लक राहिले आहेत. त्यात राष्ट्रीय स्तरावरील आणि विभागीय स्तरावरील पेपरचा समावेश आहे. यात होम सायन्स, रसानशास्त्र, बिझनेस स्टडी, बायो टेक्नॉलॉजी, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, गणित, अर्थशास्त्र, इतिहास आदी विषयांचा समावेश आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3fye1QI
via IFTTT

Post a Comment

0 Comments