सीबीएसई १० वी, १२ वी म्यूल्यांकनाचा 'असा' आहे फॉर्म्युला

सीबीएसई बोर्डाने दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करण्यासंबंधीची अधिकृत नोटीस जारी केली आहे. सीबीएसईद्वारे जारी केलेलं हे निवेदन केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल यांनी ट्विट केलं आहे. पोखरियाल यांनी ट्विट करून या नोटीशीसंदर्भातली माहिती दिली आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करताना बोर्डाने परीक्षा रद्द करण्याचा आणि वैकल्पिक परीक्षेचा पर्याय दिला आहे, तसेच मूल्यांकनाचा फॉर्म्युला दिला आहे. ज्यांचे तीन पेक्षा अधिक पेपर झाले आहेत त्यांना बेस्ट ३ च्या सरासरीने अन्य विषयांमध्ये गुण मिळणार आहेत. ज्यांचे ३ पेपर झाले आहेत त्यांना बेस्ट २ च्या सरासरीने गुण मिळणार आहेत. केवळ बारावीच्या विद्यार्थ्यांना ऐच्छिक परीक्षांची संधी मिळणार आहे. सीबीएसई दहावी, बारावी परीक्षेच्या मूल्यांकनासाठी पुढील फॉर्म्युला - - ज्यांचे तीन पेक्षा अधिक पेपर झाले आहेत त्यांना बेस्ट ३ च्या सरासरीने अन्य विषयांमध्ये गुण दिले जाणार - ज्यांचे ३ पेपर झाले आहेत त्यांना बेस्ट २ च्या सरासरीने गुण मिळणार - ज्यांनी केवळ १ किंवा २ पेपर दिले आहेत त्यांचे गुण अंतर्गत मूल्यमापनानुसार दिले जातील. आयसीएसईचे मूल्यांकनही सीबीएसईप्रमाणेच आयसीएसई बोर्डच्या दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना पूर्वपरीक्षा व अंतर्गत मूल्यांकनाच्या आधारे पर्यायी मूल्यांकन करण्याची पद्धत आठवड्याभरात वेबसाईटवर प्रसिद्ध करू, अशी हमी आयसीएसई बोर्डाने सर्वोच्च न्यायालयात दिली. ही पद्धत बहुतांश सीबीएसई बोर्डने ठरवलेल्या पद्धतीप्रमाणेच असेल, अशीही माहिती आयसीएसई बोर्डच्या वकिलांनी दिली. सीबीएसई बोर्डप्रमाणेच परीक्षा रद्द करून इच्छुक विद्यार्थ्यांना तो पर्याय नंतर उपलब्ध करण्याचा आणि परीक्षेस इच्छुक नसणाऱ्या विद्यार्थ्यांना पर्यायी गुण पद्धत स्वीकारण्याचा पर्याय देणाऱ्या निर्णयाची अधिसूचना आयसीएसई बोर्डने सर्वोच्च न्यायालयात सादर केली. निकाल १५ जुलैपर्यंत सीबीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे मूल्यांकन वर सांगितलेल्या पद्धतीनुसार करून निकाल १५ जुलैच्या आत जाहीर करण्यात येणार आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांना पुढील व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी बारावीच्या गुणांची आवश्यकता असते. हे ध्यानात घेऊन लवकरात लवकर मूल्यांकनाची प्रक्रिया पार पाडली जाईल, अशी हमी बोर्डाने न्यायालयात दिली आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2VrcDYC
via IFTTT

Post a Comment

0 Comments