परदेशी शिक्षणाचं विमान जमिनीवरच

नमिता भोसले, व्हीजेटीआय परदेशी जाऊन उच्च शिक्षण घेण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी विद्यार्थी खूप मेहनत घेत असतात. यंदा मात्र परदेशी शिक्षणाचं एकणूच चित्र विद्यार्थ्यांसाठी निराशाजनक असल्याचं दिसून येतंय. करोना संकटामुळे जगभरातील शिक्षणव्यवस्था कोलमडली असून, विद्यार्थ्यांपुढे अनेकानेक समस्या उभ्या ठाकल्या आहेत. त्यामुळे भारतातून विविध देशांत शिक्षणासाठी जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलंय. यंदा करोना विषाणूचं संकट ओढवलं आणि जगभरातल्या विद्यापीठांच्या प्रवेश प्रक्रियेला खीळ बसली. दरवर्षी सरासरी ६ लाख विद्यार्थी मास्टर्स, पीएचडी, एमबीए करण्यासाठी विदेशाचा मार्ग निवडतात. त्यापैकी साधारणपणे २.५ ते ३ लाख विद्यार्थी अमेरिकेला पसंती देतात. त्याशिवाय कॅनडा, दुबई, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, ब्रिटन या देशांमध्ये जाणाऱ्यांची संख्यासुद्धा मोठी आहे. STEM(सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनीअरिंग आणि मॅथेमॅटिक्स) शाखांमधून पदव्युत्तर शिक्षण घेऊन, त्या क्षेत्रामध्ये चांगल्या पगाराची नोकरी मिळवण्याचं स्वप्न घेऊन विद्यार्थी विदेशी जायला निघतात. परदेशात अभ्यास करण्यासाठी अनेकांना शैक्षणिक कर्ज काढावं लागतं. पण आता एवढा आटापिटा करून, तिथे जाऊनही मनासारखी इंटर्नशिप आणि नोकरी मिळेल का? असा पेच विद्यार्थ्यांना पडला आहे. अमेरिकेत करोना रुग्णांची संख्या सर्वाधिक असल्यानं मुलांना तिथे पाठवण्याबाबत पालकही संभ्रमात आहेत.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2Ab78FX
via IFTTT

Post a Comment

0 Comments