DU चे पीजी प्रवेश यंदा मुलाखतींविना

नवी दिल्ली: दिल्ली विद्यापीठात यावर्षी १२ हजारांहून अधिक पदव्युत्तर विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. पीजीच्या जागांमध्ये १५ % वाढ झाली आहे. मात्र, यावेळी पीजी प्रवेश प्रक्रियेमधून मुलाखत काढून टाकण्यात आली आहे. पीजी कोर्सच्या ५० % जागांसाठी गुणवत्तेच्या आधारे प्रवेश मिळेल. उर्वरित ५० % जागांसाठी प्रवेश परीक्षेवर आधारित असेल. आतापर्यंत सुमारे ७५ पीजी अभ्यासक्रमांसाठी आतापर्यंत ७१ हजारांहून अधिक ऑनलाईन नोंदणी झाली आहेत. शेवटची तारीख ४ जुलै २०२० आहे. मधील पदव्युत्तर पदवी अर्थात पीजीच्या अर्ध्या जागांवर प्रवेश योग्यतेवर आधारित असतील म्हणजेच यूजी निकालावर. गुणवत्तेचा पर्याय फक्त त्या विद्यार्थ्यांसाठी आहे ज्यांनी फक्त डीयूमधून यूजी केले आहे. म्हणजेच ५० % जागा डीयूच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी आहेत. युजीचा सीजीपीए निकाल टक्केवारीमध्ये (सर्व सत्रात सीजीपीए x ९.५६) बदलला जाईल. याशिवाय उर्वरित ५० % जागांसाठी प्रवेश परीक्षेच्या आधारे प्रवेश होतील, या परीक्षेसाठी कोणालाही अर्ज करता येईल. या जागांवर प्रवेश निकालाच्या गुणवत्ता यादीवर प्रवेश देण्यात येईल. डीयू प्रशासन गुणवत्ता आणि प्रवेश या दोहोंसाठी स्वतंत्र प्रवेश यादी जारी करेल. दोघांची यादी एकाच वेळी जाहीर केली जाईल. प्रवेश परीक्षा कधी? प्रवेश परीक्षेचे वेळापत्रक अद्याप ठरलेले नाही कारण कोविड - १९ मुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे परीक्षा केंद्रात परीक्षा घेण्यायोग्य स्थिती आहे का हे अद्याप स्पष्ट नाही. २०१८ पासून डीयूत एन्ट्रन्स एक्झाम सेंटरमध्ये कॉम्प्युटर बेस्ड ऑनलाइन एन्ट्रन्स टेस्ट होते. डीयू प्रवेश शाखेच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की नॅशनल टेस्ट एजन्सी (एनटीए) यासंबंधीचा निर्णय घेईल. जुलैमध्ये नीट आणि जेईई मेनसारखी प्रवेश परीक्षा घेणे देखील आता कठीण आहे. पण, डीयू ऑगस्टपर्यंत प्रतीक्षा करू शकते. जर परिस्थिती सामान्य नसेल तर दुसर्‍या पर्यायाचा विचार करावा लागेल. मागील वर्षी पीजी जागांसाठी प्रवेश परीक्षा ३ जुलैपासून सुरू झाली होती. कोविड -१९ च्या बिघडलेल्या परिस्थितीमुळे विद्यापीठाने यावेळी पीजी प्रवेशातून मुलाखतीचा निकष दूर केला आहे. मुलाखतीचे वेटेज १५ % होते. प्रवेश शाखेत म्हटले आहे की एवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांची ऑनलाईन मुलाखत घेणे शक्य नाही, त्यामुळे आता १०० % वेटेज गुणवत्तेलाच राहील. दोन नवीन अभ्यासक्रम पीजीमध्ये यावर्षी दोन नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार असून आणखी १५०० जागांवर प्रवेश घेण्यात येणार आहे. डीयूने पीजीमध्ये आर्थिक वंचित गटासाठी (ईडब्ल्यूएस, सर्वसाधारण श्रेणी) १५ % आरक्षण ठेवले आहे. त्याशिवाय विद्यापीठ या नवीन सत्रापासून विद्यापीठ दोन नवीन अभ्यासक्रमही सुरू करीत आहे. विद्यार्थी मास्टर्स-जर्नलिझम आणि एमएससी-बायोफिजिक्समध्ये प्रवेश घेऊ शकतील. २० शहरांमध्ये परीक्षा आयोजित केल्या जातील. अहमदाबाद, बेंगलुरू, भोपाळ, भुवनेश्वर, चंदीगड, चेन्नई, दिल्ली-एनसीआर, गुवाहाटी, हैदराबाद, जयपूर, जम्मू, कोलकाता, मुंबई, नागपूर, पटना, रांची, तिरुवनंतपुरम, वाराणसी, श्रीनगर आणि इम्फाल येथे प्रवेश होणार आहेत.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/38f17ob
via IFTTT

Post a Comment

0 Comments