IIM चा यंदा शुल्क न वाढवण्याचा निर्णय

कोविड -१९ संक्रमण संकटाच्या पार्श्वभूमीवर, बहुतेक इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (आयआयएम) ने यंदा एमबीए अभ्यासक्रमांच्या शुल्कात बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे. दरवर्षी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट विद्यार्थ्यांच्या वार्षिक शुल्कात वाढ करतात. यंदा शैक्षणिक सत्र २०२० साठी ही फीवाढ होणार नाही. आयआयएम अहमदाबादच्या प्रवक्त्याने सांगितले की, 'दरवर्षी फी २ ते ३ टक्क्यांनी वाढविली जाते परंतु सद्यस्थिती पाहता आयआयएम अहमदाबाद आगामी बॅचसाठी फी वाढवणार नाही.' मात्र, व्यवस्थापन संस्थांनी शुल्कवाढ न करण्याचा निर्णय घेतला असला तरी फी माफ करण्यास त्या तयार नाहीत, जी वास्तविक अनेक विद्यार्थ्यांची मागणी आहे. आयआयएम उदयपूरचे संचालक जनत शाह म्हणाले की, 'एक वर्षाच्या अभ्यासक्रमाचे वर्ग मे महिन्यात ऑनलाइन सुरू झाले आहेत. फी माफ करणे शक्य नाही कारण कॅम्पसच्या कारभाराचा खर्च संस्थांना सहन करावा लागतो.' आयआयएमचे संचालक हिमांशु राय यांनीही मान्य केले की लॉकडाऊनमुळे कॅम्पसची ऑपरेशनल कॉस्ट कमी झालेली नाही. ते म्हणाले, 'प्राथमिक खर्च संस्थेच्या शिक्षक आणि कर्मचार्‍यांवरील खर्चाच्या स्वरुपात असतो. ऑनलाइन शिक्षणासाठी संस्थांनी आयटी पायाभूत सुविधांवर बराच खर्च केला आहे. हे खर्च वेबकॅम खरेदी करण्यासाठी किंवा रिमोट अॅसेसमेंटसाठी ऑनलाईन प्रॉक्टोरिंग सॉफ्टवेअर विकत घेण्यात आले आहेत. त्यामुळे फी माफीची मागणी योग्य नाही.' ते म्हणाले की वर्षभर ऑनलाइन अभ्यास करता येत नाही कारण विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वात विकास आणि नेटवर्किंगमध्ये कॅम्पसचा अनुभव महत्वाची भूमिका बजावतो. बहुतेक संस्था जुलैच्या मध्यापासून एमबीएच्या द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी ऑन-कॅम्पस अभ्यास सुरू करण्याचा विचार करीत आहेत.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3g7Fw3N
via IFTTT

Post a Comment

0 Comments