Also visit www.atgnews.com
UPSC: केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचे नवं कॅलेंडर जाहीर
Exam Calendar revised: केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) द्वारे सिव्हिल सर्व्हिस परीक्षेव्यतिरिक्तही अनेक परीक्षांच्या तारखा आयोगाने आज जाहीर केल्या आहेत. या परीक्षांद्वारे केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये नोकरीची संधी उपलब्ध होते. दरवर्षी यूपीएससी या परीक्षांचं कॅलेंडर जारी करतं. यावर्षीदेखील आयोगाने या परीक्षांचे वार्षिक कॅलेंडर जारी केले होते. पण करोना विषाणूच्या संक्रमणामुळे उद्भवलेल्या महामारीमुळे या परीक्षा नियोजित वेळेत होऊ शकल्या नाहीत. लॉकडाऊन स्थितीमुळे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या बऱ्याच परीक्षा लांबणीवर पडल्या होत्या. आता यूपीएससीने या परीक्षांच्या नव्या तारखांची घोषणा केली आहे. वर्षभराचं सविस्तर कॅलेंडर आयोगाच्या संकेतस्थळावर जारी करण्यात आलं आहे. आयोगाने आपल्या या संकेतस्थळावर कॅलेंडर जारी केलं आहे. सिव्हिल सर्व्हिस पूर्व परीक्षा २०२० (Civil Services Prelims 2020) सह अन्य भरती परीक्षांच्या तारखाही या कॅलेंडरमध्ये देण्यात आल्या आहेत. तुम्ही यूपीएससीच्या वेबसाइटवर जाऊन कॅलेंडर डाऊनलोक करू शकता किंवा या बातमीत दिलेल्या लिंकवर यूपीएससी परीक्षांचे वेळापत्रक पाहू शकता.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2ADzBEn
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments